कुणी तरी येणार येणार गं! लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 17:08 IST2024-04-18T17:07:17+5:302024-04-18T17:08:28+5:30

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच आई होणार

kundali bhagya fame actress sana sayyed pregnant become mother after 3 years of marriage | कुणी तरी येणार येणार गं! लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

कुणी तरी येणार येणार गं! लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'कुंडली भाग्य'. झी टीव्हीवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतूनच अभिनेत्री सना सय्यद घराघरात पोहोचली. सनाला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सनाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सना गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. याबाबत अद्याप अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, लवकरच ती ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे. 

'सास बहू और साजिश'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'कुंडली भाग्य' मालिकेत पलकी ही भूमिका साकारणारी सना गरोदर आहे. सना आणि तिचा पती इमाद शम्सी पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. सना आणि इमादने २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या ३ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. प्रेग्नंन्सीमुळे सना मालिकेतून काही वेळ ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सनाच्या जागी पलकीच्या भूमिकेत दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे. 

सना आणि इमाद कॉलेजपासूनच एकमेकांना ओळखतात. ते एकमेकांचे चांगले मित्र होते. परंतु, तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये नव्हते. काही वर्षांनी पु्न्हा संपर्कात आल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर २५ जून २०२१ रोजी लग्नबंधनात अडकत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. 

दरम्यान, सनाने 'स्प्लिट्सविला' या रिएलिटी शोमधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'पापा बाय चांस' या शोमध्ये झळकली होती. 'दिव्य दृष्टी', 'लॉकडाऊन की लव्हस्टोरी', 'स्पाई बहू' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

Web Title: kundali bhagya fame actress sana sayyed pregnant become mother after 3 years of marriage