नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मीचं आगमन! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:48 IST2024-10-10T13:47:04+5:302024-10-10T13:48:01+5:30

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आई झाल्याने सर्वांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलंय

kundali bhagya fame actress sana sayyad become mother welcome baby girl | नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मीचं आगमन! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई

नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मीचं आगमन! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आई झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सना सय्यद. सनाने मुलीला जन्म दिलाय. नवरात्रीच्या दिवसांत सनाला मुलगी झाल्याने अनेकांनी तिच्या घरी लक्ष्मी आल्याची भावना व्यक्त करुन तिचं अभिनंदन केलंय. सनाने सोशल मीडियावर पोस्ट करुन तिला मुलगी झाल्याची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय. सना आणि तिचं बाळ दोघेही ठणठणीत आहेत. लवकरच सना तिच्या बाळाची झलक सर्वांसोबत शेअर करेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.

सना सय्यद झाली आई

'कुंडली भाग्य' या मालिकेमुळे सना सय्यद चांगलीच लोकप्रिय झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून सना तिचं प्रेग्नंसी फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज सनाने गुड न्यूज दिल्याने सर्व चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलंय. अभिनेत्रीने तिच्या इंन्स्टाग्रामवर 'वेलकम बेबी गर्ल' अशी पोस्ट करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये सनाला मुलगी झाल्याने अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून सनाचं अभिनंदन केलंय.



 

सना सय्यदविषयी थोडंसं...

सना सय्यद ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. सनाने 'दिव्या दृष्टी' मालिकेत दृष्टी शर्मा शेरगिल ही भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. याशिवाय 'स्पाय बहू' मालिकेतील सेजल कोटाडिया नंदा आणि 'कुंडली भाग्य' मधील डॉ. पल्की खुराना या तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. सना आई झाल्याने काही दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करायला ती नक्कीच उत्सुक असेल यात शंका नाही.

Web Title: kundali bhagya fame actress sana sayyad become mother welcome baby girl