अखेर कुणाल खेमूला घ्यावा लागला छोट्या पडद्याचा आधार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 07:15 IST2018-08-23T15:13:58+5:302018-08-24T07:15:00+5:30
आमीर खानच्या 1993 मधील या चित्रपटातील तीन मुलांपैकी सर्वात लहान असलेला कुणाल खेमू आता ‘पापा बाय चान्स’ मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिकेत झळकणार आहे.कुणाल खेमू या मालिकेत युवानच्या घनिष्ठ मित्राची भूमिका रंगविणार आहे.

अखेर कुणाल खेमूला घ्यावा लागला छोट्या पडद्याचा आधार!
छोट्या पडद्याला कधी काळी इडियट बॉक्स म्हटलं जायचं.मात्र सेलिब्रिटींसाठी छोटा पडदा इडियट बॉक्स नसून लकी ठरु लागलाय...मग ते महानायक बिग बी अमिताभ असो किंवा मग दबंग सलमान खान. कुणाचंही छोट्या पडद्यावरील प्रेम लपून राहिलं नाही...बॉलीवुडच्या प्रत्येक कलाकाराचं या ना त्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून किंवा मग सिनेमाच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्यावर दर्शन होतच असतं. आता हिच बाब कुलाल खेमूलाही लागु ठरत आहे. छोट्या पडद्यामुळे घराघरात पोहचणं सहज शक्य आहे याची जाण त्यालाही झाली आहे.म्हणूनच आता त्याला छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागतो आहे.
‘पापा बाय चान्स’ मालिकेला सुरूवात झाल्यापासून ही मालिका आमीर खानच्या ‘हम है राही प्यार के’ या चित्रपटावर बेतलेली असल्याची चर्चा होत आहे. आता या चर्चेला आणखी बढावा देण्यासाठी आणखी एक खास माहिती समोर येत आहे. आमीर खानच्या 1993 मधील या चित्रपटातील तीन मुलांपैकी सर्वात लहान असलेला कुणाल खेमू आता ‘पापा बाय चान्स’ मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिकेत झळकणार आहे. कुणाल खेमू या मालिकेत युवानच्या घनिष्ठ मित्राची भूमिका रंगविणार आहे. या भूमिकेसाठी त्याची निवड झाली असून चित्रीकरणासाठी निर्माते त्याच्या तारखा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
‘पापा बाय चान्स’ ही दिल्लीत राहणा-या युवान या 24 वर्षीय खुशालचेंडू तरुणाची कथा आहे. भरपूर श्रीमंत असल्यामुळे युवान हा आपल्या मर्जीनुसार जीवन जगत असतो. पण जगात तो दोनच गोष्टींना घाबरत असतो- एक म्हणजे दिलेले आश्वासन पाळणे आणि दुसरी म्हणजे लहान मुले. त्याच्या व्यक्तिरेखेला विविध पदर आहेत. पण नियतीच्या विचित्र खेळामुळे त्याचे जीवन 360 अंशात फिरते आणि त्याला एक-दोन नव्हे, तर चक्क तीन मुलांची जबाबदारी स्वीकारावी लागल्याने तो निव्वळ अपघाताने त्या मुलांचा बाबा (‘पापा बाय चान्स’) बनतो!
आपल्या मस्त उडत्या चालींवर लोकांना डान्स करायला लावल्यानंतर रफ्तार आता भारतीय टेलिव्हिजनवर स्क्रीन धमाका उडवणार आहे. स्टार भारतवरील आगामी कौटुंबिक मालिका पापा बाय चान्समधील बिनधास्त दिल्ली बॉय युवानची ओळख करून देताना रफ्तार रॅपिंग करेल. वाहिनीने एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख अशा पद्धतीने फारच कमी वेळा केली असेल. वाहिनीने शोधून काढलेला झेबी सिंग हा युवानच्या व्यक्तिरेखेसाठी अगदी अनुरूप असून युवानला वर्तमानात जगायला आवडते.