आई, प्लीज परत ये..., ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री नैना सिंहवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 10:15 IST2022-02-07T10:13:18+5:302022-02-07T10:15:24+5:30

Naina Singh : नैनाने आईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक इमोशनल पोस्ट टाकली आहे. ‘आई प्लीज परत ये...’, अशा शब्दांतील तिची ही पोस्ट वाचून क्षणभर तुम्हीही भावुक व्हाल.

Kumkuma Bhagya And Bigg Boss Fame Naina Singh Mother Died Actress Broke Down | आई, प्लीज परत ये..., ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री नैना सिंहवर कोसळला दु:खाचा डोंगर

आई, प्लीज परत ये..., ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री नैना सिंहवर कोसळला दु:खाचा डोंगर

‘कुमकुम भाग्य’ फेम (Kumkuma Bhagya)अभिनेत्री नैना सिंह ( Naina Singh) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच नैनाच्या आईचं निधन झालं. स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.
नैनाने आईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक इमोशनल पोस्ट टाकली आहे. ‘आई प्लीज परत ये...’, अशा शब्दांतील तिची ही पोस्ट वाचून क्षणभर तुम्हीही भावुक व्हाल.

ती लिहिते, ‘आई प्लीज परत ये...माझं मन सुन्न झालं आहे, माझं मन रडत आहे आणि माझे डोळे थकले आहेत. मला सध्या काय वाटत आहे, ते सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. कदाचित तू चांगल्या ठिकाणी असशील, याचं समाधान आहे. पण तुझ्याशिवाय मी काय करू? तुझी लहान मुलगी तुझ्या आठवणीत व्याकूळ झाली आहे. आई, मला तुझी नेहमी आठवण येईल. आईपेक्षा जास्त तिच्या मुलावर कोणीही प्रेम करू शकत नाही. मला तुझंप्रेम, तुझी काळजी, तुझी काळजी आणि तुझा ओरडा सगळं काही आठवेल. आपण एकत्र केलेल्या सर्व गोष्टी मला आठवतील.
रात्री उशिरापर्यंत मी बाहेर असल्यावर मला घरी यायला आता कोण सांगेल? माझ्यावर कोण ओरडेल? जेव्हा मला सल्ल्याची गरज असेल तेव्हा मला कोण सल्ला देणार?   मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणार? मी आनंदाच्या गोष्टी कोणाशी शेअर करणार? माझ्यासाठी जगातील सर्वोत्तम जेवण कोण बनवणार? मी सण कोणासोबत साजरे करणार? माझ्यासाठी अशा छोट्या भेटवस्तू कोण विकत घेणार?
मी तुझ्यावर खूप प्रेम करते मम्मा. बेरी अजून तुझी घरी येण्याची वाट पाहत आहे. तू मला नेहमीच आयुष्याला सामोरे जाण्याची हिंमत दिलीस आणि आज मी जी आहे ती फक्त तुझ्यामुळे. मी नेहमीच तुझी धाडसी मुलगी असेन. मला माहित आहे की तू माझ्यावर वरून हसशील आणि नेहमी माझं संरक्षण करशील. माझ्या हृदयातील ही पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही...’

Web Title: Kumkuma Bhagya And Bigg Boss Fame Naina Singh Mother Died Actress Broke Down