पुत्र जन्मला! 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं झालं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:06 IST2025-06-08T10:02:36+5:302025-06-08T10:06:53+5:30

पुत्र जन्मला! 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

kumkum bhagya fame actress pooja banerjee welcome second child a baby boy share good news with fans  | पुत्र जन्मला! 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं झालं आगमन

पुत्र जन्मला! 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं झालं आगमन

Pooja Banerjee: लोकप्रिय हिंदी मालिका 'कुमकुम भाग्य', 'कसौटी जिंदगी की' अशा मालिकांमधून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजे पूजा बॅनर्जी (Pooja Banerjee). पूजाने नकारात्मक भूमिकांमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकांच्या माध्यमातून तिने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला. नुकतीच पूजाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

दरम्यान, अभिनेत्री पूजा बॅनर्जीचे पती संदीप सेजवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला असल्याची माहिती दिली आहे. त्याबोलताना ते म्हणाले, " आज सकाळी (७ जून) रोजी पूजाने मुलाला जन्म दिला. आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. पूजा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत." तर पूजा बॅनर्जी म्हणाली, "आम्हाला ही बातमी सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे आणि आता आमचं चौकोनी कुटुंब आहे." असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पूजा बॅनर्जीने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय जलतरणपटू संदीप सेजवालशी लग्न केलं होतं. पुजाने सध्या सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जोडप्याला आधी एक मुलगी आहे. तिचं सना असं नाव आहे. सनाचा जन्म २०२२ मध्ये झाला होता.

वर्कफ्रंट-

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने एमटीव्ही 'रोडीज'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिला 'एक दससे से करते हैं प्यार हम' या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला ब्रेक मिळाला, जो त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर ती 'चंद्रकांता', 'चंद्र नंदिनी', 'दिल ही तो है', 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम भाग्य' यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच पूजाने कहने को हमसफर हैं' मधून ओटीटीवर पदार्पण केलं.

Web Title: kumkum bhagya fame actress pooja banerjee welcome second child a baby boy share good news with fans