कृष्णा अभिषेक दिसणार 'ओएमजी! ये मेरा इंडियाच्या' दहाव्या सीझनमध्ये, म्हणतो - "हा सीझन आहे खूप खास.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:04 IST2024-02-07T18:04:31+5:302024-02-07T18:04:44+5:30
OMG! Yeh Mera India : हिस्टरी टीव्ही१८ वरील लोकप्रिय शो ओएमजी! ये मेरा इंडियाचा दहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर होणार आहे.

कृष्णा अभिषेक दिसणार 'ओएमजी! ये मेरा इंडियाच्या' दहाव्या सीझनमध्ये, म्हणतो - "हा सीझन आहे खूप खास.."
हिस्टरी टीव्ही१८ वरील लोकप्रिय शो ओएमजी! ये मेरा इंडिया(OMG! Yeh Mera India)चा दहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर होणार आहे. या हिट मालिकेचा नवीन सीझन प्रेक्षकांना संपूर्ण देशाची सफर घडवेल आणि त्यातून नावीन्यपूर्णता, आमूलाग्र बदल आणि प्रेरणा या गोष्टींची ओळख होईल. या शोचं सूत्रसंचालन कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) करणार आहे.
लोकप्रिय विनोदवीर आणि निवेदक कृष्णा अभिषेक हा पहिल्या दिवसापासून या ट्रेंडिंग शोचा चेहरा ठरला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, "ओएमजी! ये मेरा इंडिया’ही मालिका माझ्या करियरमधील सर्वाधिक यशस्वी शोजपैकी एक आहे. या महान देशाच्या अज्ञात गोष्टी जगापुढे आणणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा नवीन सीझन खूप सुंदर गोष्टी आपल्यासमोर आणेल आणि ती प्रेक्षकांसाठी नक्कीच एक दृश्य मेजवानी असेल. हा सीझन खूप खास आहे आणि तो शोच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा ठरेल."
ओएमजी! ये मेरा इंडिया ही मालिका देशाच्या अद्वितीय वैविध्यपूर्णता आणि वेगळेपणावर प्रकाशझोत टाकणारी ठरली आहे. दहावा सीझन आतापर्यंतचा सर्वात वेगळा ठरेल. हिस्टरी टीव्ही१८वर टीमने तयार केलेल्या ४० अप्रतिम खऱ्या कथांसह, दहापैकी प्रत्येक भागात अशा व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेतो ज्यांनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने, सामाजिक प्रभावाचे उपक्रम, तांत्रिक कल्पनाशक्ती, विक्रमी पराक्रम, विलक्षण वेड आणि स्वारस्यांसह समाजात बदल घडवले आहेत. टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक निष्ठावान चाहता वर्ग निर्माण करून या मालिकेने भारतभर मने जिंकली आहेत. सेलिब्रेटी आणि विचारवंत नेत्यांसह लाखो लोकांना आकर्षित करणारी ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.