​क्रतिका सेनगर सांगतेय मी अभिनय करण्याचा कधी विचारच केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 14:14 IST2017-02-21T08:44:27+5:302017-02-21T14:14:27+5:30

क्रतिका सेनगरने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने कसौटी जिंदगी की, ...

Krrishika Sengar tells me I had never thought of acting | ​क्रतिका सेनगर सांगतेय मी अभिनय करण्याचा कधी विचारच केला नव्हता

​क्रतिका सेनगर सांगतेय मी अभिनय करण्याचा कधी विचारच केला नव्हता

रतिका सेनगरने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने कसौटी जिंदगी की, किस देस में है मेरा दिल यांसारख्या मालिकेत काम केले. झाँसी की रानी या मालिकेद्वारे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. पुनर्विवाह या मालिकेतील तिची भूमिका तर सगळ्यांना आवडली होती. सध्या ती कसम तेरे प्यार की या मालिकेत तनू ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
क्रतिकाने आज एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी अभिनय करण्याचा मी कधी विचारच केला नव्हता असे ती सांगते. अनपेक्षितपणे या क्षेत्रात माझे पदार्पण झाले असेदेखील ती सांगते. तिच्या एका मित्रामुळे ती या क्षेत्रात आली असल्याचे ती कबूल करते. छोट्या पडद्यावरील तिच्या आगमनाविषयी ती सांगते, "मी कानपूरमध्ये राहात होती. इतक्या छोट्या शहरातून मी आल्यामुळे मी या क्षेत्रात येईन असा मी कधी विचारदेखील केला नव्हता. माझ्या ओळखीच्या लोकांमध्येदेखील कोणी या इंडस्ट्रीशी संबंधित नव्हते. त्यामुळे ही दुनियाच वेगळी असल्याचे मला नेहमीच वाटत असे. मी एका जाहिरात कंपनीमध्ये इंटरशिप करण्यासाठी मुंबईला आले होते. त्यावेळी माझ्या कॉलेजमधील एक सिनियर बालाजी टेलिफ्लिम्समध्ये काम करत होता. त्याने मला तू बालाजीच्या मालिकेत काम करणार का असे विचारले होते. त्यावेळी मी त्याला होकार दिला आणि अशाप्रकारे मी या क्षेत्रात आले. पण आता इतक्या वर्षांनी अभिनय हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे." 

Web Title: Krrishika Sengar tells me I had never thought of acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.