​करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 16:25 IST2017-02-25T09:27:27+5:302017-02-25T16:25:40+5:30

क्रितिका कार्मा आणि करण कुंद्रा अनेक वर्षं नात्यात होते. कितनी मोहब्बत है या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली ...

Kritika Karmala tells Karan Kundra and Anushka Dandekar to be my best friend | ​करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला

​करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला

रितिका कार्मा आणि करण कुंद्रा अनेक वर्षं नात्यात होते. कितनी मोहब्बत है या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असे. पण कितनी मोहोब्बत है ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. करण सध्या व्हिजे अनुष्का दांडेकरसोबत नात्यात आहे. करण आणि अनुष्का नेहमीच त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. आज करण आणि अनुष्काचे ब्रेकअप होऊन कित्येक महिने झाले असले तरी ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. एवढेच नव्हे तर क्रितिका आणि अनुष्का या दोघीदेखील एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

karan kundra and anusha dandekar

करण, क्रितिका आणि अनुष्का अनेकवेळा एकत्र फिरायला जातात. तसेच खूप मजा-मस्ती करतात असे क्रितिका सांगते. तसेच अनुष्का ही करणसाठी अगदी योग्य असल्याचेही तिचे म्हणणे आहे. अनुष्का आणि करण हे खूप चांगले जोडपे असल्याचेही तिला वाटते. याविषयी क्रितिका सांगते, "मी नेहमीच माझ्या पूर्वप्रियकरांसोबत चांगले नाते ठेवले आहे. करणसोबतदेखील आजही माझे नाते खूप चांगले आहे. करण आणि माझ्या नात्याची सुरुवात मैत्रीतून झाली होती आणि हे नाते पुन्हा एकदा मैत्रीवरून येऊन थांबले आहे. मी अनुष्का आणि करणसाठी खूप खूश आहे. आम्ही तिघे अनेकवेळा एकत्र फिरायला जातो. मला अनुष्का तर खूप आवडते. ती खूप चांगली मुलगी आहे. तिला मजा-मस्ती करायला आणि लोकांना हसवायला खूप आवडते. ती करणलादेखील खूप हसवते. तसेच त्याला स्टाइलमध्ये राहाण्यासाठीदेखील ती मदत करते." 


 

Web Title: Kritika Karmala tells Karan Kundra and Anushka Dandekar to be my best friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.