कृष्णा म्हणतो, हा तनिष्ठाचा पब्लिसिटी स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 13:07 IST2016-09-29T07:35:33+5:302016-09-29T13:07:39+5:30
‘कॉमेडी नाइट्स बचाओ’च्या सेटवर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी वर्णभेदाची शिकार ठरली. या शोमध्ये तिला ‘काली कलुटी’ संबोधण्यात आले. यामुळे संतापून ...
.jpg)
कृष्णा म्हणतो, हा तनिष्ठाचा पब्लिसिटी स्टंट
‘ ॉमेडी नाइट्स बचाओ’च्या सेटवर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी वर्णभेदाची शिकार ठरली. या शोमध्ये तिला ‘काली कलुटी’ संबोधण्यात आले. यामुळे संतापून तनिष्ठा कार्यक्रमातून बाहेर पडली. शिवाय सोशल मीडियावर याबद्दलचा संतापही बोलून दाखवला. आता या संपूर्ण वादावर ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ होस्ट करणारा कृष्णा अभिषेक याने चुप्पी तोडली आहे. त्याच्या मते, हा संपूर्ण वाद म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. तनिष्ठा हे सगळं पब्लिसिटीसाठी करतेय. आमच्या सेटवर येणाºया प्रत्येक सेलिब्रिटींना आम्ही शोपूर्वी भेटतो. मी तनिष्ठालाही याबाबत विचारले होते. तू आमचा शो पाहिला आहेस का? शोचा कन्सेप्ट तुला माहिती आहे का? हे तिला विचारण्यात आले होते. मी शो पाहिलेला नाही, असे तिने आम्हाला सांगितले. जर तिने शो पाहिलेला नव्हता, तर तिने या शोमध्ये यायला नको होते. तरिही ‘पार्च्ड’च्या प्रमोशनसाठी लीना यादव व राधिका आपटेसोबत ती सेटवर आली. आम्ही राधिकाला अधिक जास्त महत्त्व दिले. कारण आमच्यासाठी ती मोठी स्टार होती. कदाचित हीच बाब तनिष्ठाला खटकलेली असावी. आमची स्क्रिप्ट नेहमीसारखीच होती. तनिष्ठाही सुरवातीला सगळे एन्जॉय करतानाच दिसली. पण अचानक तनिष्ठाला काय प्रॉब्लेम झाला, तेच आम्हाला कळले नाही, असे कृष्णा म्हणाला.
![]()
अर्थात ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ प्रसारित करणाºया कलर्स वाहिनीने मात्र यासाठी तनिष्ठाची माफी मागितली. कळत-नकळत आमच्या शोमध्ये तनिष्ठाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही तिची क्षमा मागतो, असे वाहिनीने स्पष्ट केले.
अर्थात ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ प्रसारित करणाºया कलर्स वाहिनीने मात्र यासाठी तनिष्ठाची माफी मागितली. कळत-नकळत आमच्या शोमध्ये तनिष्ठाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही तिची क्षमा मागतो, असे वाहिनीने स्पष्ट केले.