पतीसोबत हनिमूनवर गेलेल्या अभिनेत्रीने शेअर केले बिकिनीतील फोटो, लोकांनी केलं तिला ट्रोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:56 IST2023-03-30T15:37:38+5:302023-03-30T15:56:23+5:30

सोशल मीडियावर नेटिझन्स तिला खरी खोटी सुनावतायेत.

krishna mukherjee trolled for sharing bikini photo from honeymoon netizens said bangali urfi javed | पतीसोबत हनिमूनवर गेलेल्या अभिनेत्रीने शेअर केले बिकिनीतील फोटो, लोकांनी केलं तिला ट्रोल, म्हणाले...

पतीसोबत हनिमूनवर गेलेल्या अभिनेत्रीने शेअर केले बिकिनीतील फोटो, लोकांनी केलं तिला ट्रोल, म्हणाले...

'ये है मोहब्बतें' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कृष्णाने काही काळापूर्वी तिचा बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालासोबत लग्न केले आहे आणि सध्या दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, जिथे ती तिचे हनीमूनचे फोटो शेअर करत असते.  अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या बिकिनी लूकमुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं जातंय. 

कृष्णा मुखर्जीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा बिकिनी सेट घातला आहे आणि फोटोंमध्ये ती सनबाथ घेताना दिसतेय. कृष्णा मुखर्जीचा हा लूक चाहत्यांना फारसा आवडला नाही, त्यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. लोक तिला खरी-खोटी सुनावता येत. 

कृष्णा मुखर्जीच्या या फोटोंवर एका चाहत्याने लिहिले, 'बंगाली उर्फी.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'स्वतःची लाज बाळगा.' आणखी एका यूजरने म्हटले की, 'कोणती विवाहित मुलगी असे कपडे घालते.

कृष्णा मुखर्जीने चिराग बाटलीवालाबरोबर १३ मार्चला लग्नगाठ बांधली. बंगाली आणि पारसी रितवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. गोव्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. चिराग हा नौदलाचा अधिकारी आहे ज्याच्यासोबत अभिनेत्रीने जवळपास एक वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. 

Web Title: krishna mukherjee trolled for sharing bikini photo from honeymoon netizens said bangali urfi javed