कृष्णा आणि कपिलचं कोल्ड-वॉर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 17:12 IST2016-07-18T07:48:04+5:302016-07-18T17:12:15+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोला रिप्लेस केल्यानंतर त्याला या ना त्या पद्धतीनं मागे टाकण्यासाठी कृष्णा अभिषेक जोरदार प्रयत्न करतोय. ...
.jpg)
कृष्णा आणि कपिलचं कोल्ड-वॉर
क मेडी किंग कपिल शर्माच्या शोला रिप्लेस केल्यानंतर त्याला या ना त्या पद्धतीनं मागे टाकण्यासाठी कृष्णा अभिषेक जोरदार प्रयत्न करतोय. मात्र काही केलं तरी 'द कपिल शर्मा' शोला पछाडण्यात कृष्णाच्या कॉमेडी नाईट लाइव्हला यश आलेलं नाही. त्यातच कृष्णाचा हा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे.मात्र शो बंद होण्याच्या या निव्वळ अफवा असून त्या कोण पसरवतं हे जगजाहीर असल्याचं कृष्णानं कपिलच नाव घेता म्हटलंय.आता कृष्णाचा इशारा हा कपिलकडे होता की त्याच्या आपल्या शोच्या टीमकडे हे कृष्णालाच माहित. मात्र यावरुन कपिल आणि कृष्णाचा छत्तीसचा आकडा हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.