टीआरपी गडगडला! अवघ्या ८ महिन्यातंच 'ही' लोकप्रिय मालिका बंद होणार, मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:30 IST2026-01-01T11:17:02+5:302026-01-01T11:30:12+5:30
प्रेक्षकांना धक्का! अवघ्या ८ महिन्यातंच ही मालिका संपणार, चाहते नाराज

टीआरपी गडगडला! अवघ्या ८ महिन्यातंच 'ही' लोकप्रिय मालिका बंद होणार, मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष
Marathi Tv Serial: सध्या छोट्या पडद्यावरील मालिका बघणारा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मालिकांमधील पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. त्यामुळे दैनंदिन मालिकांमध्ये जरा देखील बदल झाला तरी त्याचा परिणाम हा हल्ली टीआरपीवर दिसून येतो. मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी टीआरपीला प्रचंड महत्व दिलं जातं. त्यामुळे अनेक मालिका वर्षभरातच बंद होताना दिसतात. ज्या मालिकांच्या टीआरपीचा आलेख चढता असतो त्या मालिका वर्षानुवर्ष टिकून राहतात. अशी एक प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या ५ जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेली मालिका रोज सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामुळे रेश्मा शिंदेच्या घरोघरी मातीच्या चुली या कौटुंबिक मालिकेचा टाईम स्लॉट बदलण्यात आला आहे. ही मालिका आता ५ जानेवारीपासून रोज रात्री १०.३० वाजता पाहायला मिळणार आहे. मात्र, याचवेळेस गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची भूमिका असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रसारित होते. त्यामुळे आता या मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. या सगळ्या चर्चांवर मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने दिलेली रिअॅक्शन चर्चेत आली आहे. दरम्यान, अद्याप याबाबत वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली.कावेरी आणि यश यांची अनोखी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.अवघ्या ८ महिन्यात मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या मालिकेतील कावेरी धर्माधिकारीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभूने हिने सोशल मीडियावर या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहेत.