मालिकेच्या सेटवर भेट ते मुंबई एअरपोर्टवर प्रपोज! साक्षी-अथर्वच्या प्रेमाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:19 IST2026-01-07T13:17:00+5:302026-01-07T13:19:52+5:30
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून कोण होतीस तू काय झालीस तू फेम साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. आता लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत.

मालिकेच्या सेटवर भेट ते मुंबई एअरपोर्टवर प्रपोज! साक्षी-अथर्वच्या प्रेमाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली....
Sakshi Mahajan And Atharv Karve: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघन जाधव, अनुष्का पिंपुटकर तसेच पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड या कलाकारांनंतर आता आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता अथर्व कर्वे आणि साक्षी महाजन. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अथर्व-साक्षीने त्यांची लव्हस्टोरी शेअर केली आहे.
साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे. या त्यांच्या प्रवासात कोणत्या गोष्टी घडल्या. याचा खुलासा केला आहे. अथर्व आणि साक्षीची पहिली भेट ही विठू माऊली मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते दोघेही लग्न करत आहेत. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखती साक्षी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगताना म्हणाली," २०१८ ची ही गोष्ट आहे, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आले होते.मुबईत आल्यानंतर विठू माऊली ही माझी पहिली मालिका होती. त्यामुळे मला मुंबईचा काहीच अनुभव नव्हता. या मालिकेच्या सेटवर आल्यानंतर तिथे एक मुलगा होता. ज्याने सुरुवातीला खूप अॅडिट्यूड दिला होता. तो अथर्व होता."
मग पुढे साक्षी म्हणाली,"त्यानंतर मला आठवलं अरे, याला आपण कुठेतरी पाहिलं आहे. मग मला कळलं हा सारेगमप, एकापेक्षा एकमध्ये काम केलेला मुलगा आहे. त्या मालिकेसाठी माझी लूक टेस्ट होती. तेव्हा त्या सेटवर याची आई माझ्याशी बोलत वगैरे होती पण हा असाच आला आईकडे फोन मागितला आणि गेला. मी म्हटलं अरे, हा असा काय साधं हाय, हॅलो पण याने केलं नाही. " ऑडिशनला जवळजवळ १२-१३ मुली आल्या होत्या, असं साक्षीने सांगितलं. सुरुवातीला अथर्वला या भूमिकेसाठी मी आवडले नव्हते. त्यातही मालिकेत आमचा पहिला सीन लग्नाचा होता. असा किस्साही तिने शेअर केला.मग अथर्व काय म्हणाला... "आमची मालिकेत निवड झाल्यानंतर ही मुलगी चांगली आहे, असं मला वाटलं. तिचं पहिलं इम्प्रेशन हे थोडसं असं लाऊड पर्सनॅलिटी असं आहे. ती खूप ओव्हर एक्स्ट्रोव्हर्ट आणि मी इंट्रोव्हर्ट आहे. त्यामुळे या गोष्टी घडल्या असाव्या. "
अशी सुरु झाली प्रेमकहाणी!
या मुलाखतीत अथर्व म्हणाला, "पहिल्यांदा मीच तिला अप्रोच केला. साक्षीने परीक्षेसाठी ४ दिवस सुट्टी घेऊन यवतमाळला गेली होती. ही फ्लाईटने नागपूरपर्यंत जायची आणि तिथून पुढे यवतमाळला जायची. तोपर्यंत आमची मैत्री आणि एकमेकांवर प्रेम आहे, असं जाणवलं होतं. पण, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, असं काही क्लिअर झालं नव्हतं. जेव्हा ती मुंबईत परत आली तेव्हा मी रिसिव्ह करण्यासाठी गेलो. शूट संपवून मी तिला घेण्यासाठी गेलो, त्यामुळे खूप काही प्लॅन करता आलं नाही. फक्त हातात बुके आणि चॉकलेट घेऊन गेलो. ती एअरपोर्टवर आली आणि मग मी तिला सांगितलं, असं आहे... मला तू आवडतेस ... यानंतर मला वाटलं ही विचार वगैरे करून सांगेल. पण, तसं घडलं नाही आणि तिने होकार दिला."