"काटे रुतले, वेलीत पाय अडकत होता अन्...", गिरीजा प्रभूने सांगितला 'त्या' चिखलातील सीनच्या शूटिंगचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:26 IST2025-05-23T12:21:57+5:302025-05-23T12:26:14+5:30
गिरीजा प्रभूने सांगितला 'त्या' चिखलातील सीनच्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली...

"काटे रुतले, वेलीत पाय अडकत होता अन्...", गिरीजा प्रभूने सांगितला 'त्या' चिखलातील सीनच्या शूटिंगचा अनुभव
Girija Prabhu: सध्या मराठी मालिकाविश्वात 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेची मोठी चर्चा आहे. २८ एप्रिल २०२५ पासून सुरु झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियचा मिळवली आहे. दरम्यान, कोण होतीस तू काय झालीस तू च्या माध्यमातून महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक तसेच कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षक स्तुती करत आहेत. अशातच अलिकडेच या मालिकेतील एका सीनसाठी गिरीजा प्रभूने कमळाच्या दलदलीत उतरुन शूट केलं होतं. या सीनचीसोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होती. त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्या सीनबद्दल अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये गिरीजाने किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच अभिनेत्री गिरीजा प्रभूने 'अल्ट्रा बझ'ला मुलाखत दिली. त्या संवादादरम्यान अभिनेत्रीने चिखलात उतरल्याच्या सीनबद्दल तिचा अनुभव शेअर केला आहे. त्याबद्दल सांगताना गिरीजा म्हणाली, शूटिंगच्या दिवशी मी जेव्हा पाण्यात गेले तिथे सुरुवातील खडी होती. त्यासाठी लंगडत लंगत आले कारण त्याआधी अपघाताचा सीन दाखवण्यात आला होता. त्यादरम्यान, ती पायात टोचत होती. त्यानंतर जेव्हा मी पाण्यात हळूहळू आतमध्ये जात होते, तेव्हा तिथे दलदल होती. या सीनसाठी मी साडी नेसल्यामुळे पाण्यामुळे ती साडी फुगून वर येत होती. कारण, तेव्हा ड्रोन शॉट्स होते आणि कॅमरा असल्यामुळे मला ती साडी सांभाळत तलावात जायचं होतं. अर्थात टीमधला एक माणूस तिथे होता. पण आतमध्ये गेल्यानंतर पाण्यात खाली सगळ्या वेळी होत्या. त्यात पाय अडकत होता. शिवाय काटे पायाला लागत होते."
पुढे गिरिजाने सांगितलं, "असं सगळं करत तो सीन शूट करण्यात आला. हा खूप छान अनुभव होता. हे सगळं टीमवर्क आहे. यामध्ये सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यावेळी कॅमेरा टीम जेव्हा पाण्यात आली तेव्हा त्यांची अशी रिअॅक्शन होती की, अरे हे वाटतंय तितकं सोप नाही आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.