आता कोमल भाभीने 'तारक मेहता..' मालिका सोडली? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:13 IST2025-08-20T11:08:54+5:302025-08-20T11:13:23+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कोमल भाभीने मालिकेतून एक्झिट घेतली असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने मौन सोडलंय

आता कोमल भाभीने 'तारक मेहता..' मालिका सोडली? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली-
टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'कोमल भाभी' म्हणजेच अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी मालिका सोडल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू होती. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये अनेक जुने कलाकार मालिका सोडून जात असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोमल भाभी भूमिकेतून गायब झाल्याने अंबिका यांच्या एक्झिटच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, अंबिका रंजनकर यांनी एका मुलाखतीत या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.
"मी शो सोडलेला नाही. मी अजूनही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चा भाग आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर, त्या शोमधून काही काळासाठी त्या का दिसत नव्हत्या, याचे कारणही त्यांनी दिले. "काही वैयक्तिक कारणांमुळे मी काही दिवस शूटिंगपासून दूर होते. मला माझ्यासाठी थोडा वेळ हवा होता," असे त्या म्हणाल्या.
अंबिका रंजनकर या गेल्या १७ वर्षांपासून या मालिकेत कोमल भाभीचे पात्र साकारत आहेत. त्यांचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर मालिकेच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी शो सोडल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. दयाबेन (दिशा वकानी), तारक मेहता (शैलेश लोढा) आणि सोढी (गुरुचरण सिंग) यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यामुळे, कोमल भाभी मालिकेतच राहणार असल्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या तारक मेहता.. मालिकेत गोकुलधाम सोसायटीमध्ये एका नवीन कुटुंबाची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे कथानकात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या नवीन घटनाक्रमांमुळे 'तारक मेहता' पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.