Koffee with Karan: सेक्सवर बोलण्यास कपिल शर्माने दिला होता करण जोहरला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 18:11 IST2017-02-28T12:21:07+5:302017-02-28T18:11:39+5:30

एरव्ही बॉलिवूडच्या काही दिग्गजांनी सेक्स,बेडरुम सिक्रेट्सपासून ते लग्नाआधी सेक्स या विषयावर आपली रोखठोक मतं मांडली आहेत. अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ...

Koffee with Karan: Kapil Sharma had given up on Kapil Sharma to speak on sex | Koffee with Karan: सेक्सवर बोलण्यास कपिल शर्माने दिला होता करण जोहरला नकार

Koffee with Karan: सेक्सवर बोलण्यास कपिल शर्माने दिला होता करण जोहरला नकार

व्ही बॉलिवूडच्या काही दिग्गजांनी सेक्स,बेडरुम सिक्रेट्सपासून ते लग्नाआधी सेक्स या विषयावर आपली रोखठोक मतं मांडली आहेत. अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही मंडळी सेक्सविषयी बेधडक बोलताना दिसतात.मात्र कॉमेडी किंग कपिल शर्माने कॉफी विथ करण शोमध्ये सेक्सविषयी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे करण आणि कपिल यांच्यात बिनसल्याचेही कळतेय.मध्यंतरी कपिल शर्मा त्याच्या ट्वीट करण्याच्या सवयीमुळे खूप चर्चेत आला होता.अशा एका रोखठोक ट्वीटमुळे कपिलवर खूप टीकाही करण्यात आली होती.तोच धागा पकडत करणने कपिलला विचारले होते की, रात्रभर ट्वीट करत असतो तुझी सेक्सलाईफ तर डिस्टर्ब नाही ना? असा सवाल विचारताच कपिल करणवर नाराज झाला होता. या प्रश्नावर त्याने त्याच्याच खास स्टाइलने करणला सुनावलेही होते. खरंतर करण जोहर आणि कपिल शर्मा दोघेही त्यांच्या शोचे प्रमोशन एकमेकांच्या शोमध्ये हजेरी लावून करणार होते.मात्र जेव्हा करणने कपिलला असिस्टंट म्हणून संबोधले तेव्हापासूनच कपिलचे करणसह खटकल्याचे कळतेय.तेव्हापासून आजपर्यंत कपिल करणवर नाराज आहे.त्यामुळे जेव्हा जेव्हा कपिलच्या शोमध्ये करणचा विषय निघतो तेव्हा तेव्हा कपिलने जाणीवपूर्वक करणचा उल्लेख टाळल्याचे पाहायला मिळाले.  कॉफी विथ करण शोमध्ये कपिलने करणने विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न दिल्यामुळे या भागाचे प्रेक्षपण करणार नसल्याचेही करणने ठरवले होते. मात्र कपिलची पॉप्युलारिटी बघता  या भागाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला असून त्या भागाचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. शेवटी 'जो दिखता है, वही बिकता है' या युक्तीवर  करणला हार मानावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे एरव्ही सेलिब्रेटींची मुलाखत घेणारा कपिल कॉफी विथ करण या शोमध्ये एक सेलिब्रेटी म्हणून हजेरी लावणार आहे.त्यामुळे करण जोहर कपिलची मुलाखत घेताना पाहणे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Koffee with Karan: Kapil Sharma had given up on Kapil Sharma to speak on sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.