बिग बॉस 13 : घरातील ही व्यक्ती म्हणतेय, प्लास्टिक सर्जरी ही आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:05 IST2019-10-01T12:59:22+5:302019-10-01T13:05:37+5:30

प्लॉस्टिक सर्जरी केल्यानंतर तिला काम मिळणंच बंद झाले.

Koena mitra said plastic surgery was a wrong decision of my life | बिग बॉस 13 : घरातील ही व्यक्ती म्हणतेय, प्लास्टिक सर्जरी ही आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक

बिग बॉस 13 : घरातील ही व्यक्ती म्हणतेय, प्लास्टिक सर्जरी ही आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक

अभिनेत्री कोएना मित्रानेबिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. अभिनेत्री कोएनाला साकी गर्ल म्हणून ओळखले जाते. तिने मुसाफिर, अपन सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. मुसाफिर या चित्रपटातील साकी साकी या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.  कोएना तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत असते. अधिक सुंदर दिसण्यासाठी कोएनाने नाकाची सर्जरी केली मात्र ती फसली. त्यानंतर दिग्दर्शकांनी तिला सिनेमात काम देणं बंद केले. प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर जवळपास सहा महिने कोएना घरीच बसली होती.    


यानंतर कोएना लाईमलाइटपासून दूर झाली. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यामुळे कोएना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार कोएनाने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी दिलेल्या मुलाखतात प्लास्टिक सर्जरीबाबतचा खुलासा केला आहे.  


कोएना म्हणाली, या इंडस्ट्रीत सगळेच असे करतात, काही लोक सांगतात तर काही लोक नाही सांगत. हा काही गुन्हा किंवा पाप नाही. मला याबाबत बोलायची इच्छा नाहीय. मी यावर बोलले आणि गेली आठ-नऊ वर्ष ही गोष्ट माझा पिच्छा सोडत नाहीय. लोक मला सतत यावरुनच प्रश्न विचारत. पुढे ती म्हणाली, हे माझं आयुष्य आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने जगणार. माणसाकडून आयुष्यात खूप चुका होतात. मात्र जोपर्यंत त्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेत नाहीत तोवर ती गोष्ट बरोबर आहे की चुकीची हे कसं कळणार.'' कोएनाच्या या बोलण्यावरुन हे स्पष्ट होते की प्लास्टिक सर्जरी ही तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.  कोएना आता बिग बॉसच्या घरात आपला काय जलवा दाखवणार हे आपल्याला लवकरच कळेल.

Web Title: Koena mitra said plastic surgery was a wrong decision of my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.