'मुलगी झाली हो' मालिकेतील ACP सिद्धांतबद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 17:58 IST2021-05-20T17:37:24+5:302021-05-20T17:58:15+5:30

स्मॉल स्क्रिन वरील ‘मुलगी झाली हो ‘ या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

Know things about mulagi zali ho fame siddharth khiradi | 'मुलगी झाली हो' मालिकेतील ACP सिद्धांतबद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी

'मुलगी झाली हो' मालिकेतील ACP सिद्धांतबद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी

स्मॉल स्क्रिन वरील ‘मुलगी झाली हो ‘ या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.या मालिकेबरोबरच प्रेक्षक या मालिकेतील सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम करतायेत. ज्या प्रमाणे शौनक आणि माऊची जोडी प्रेक्षकांना आवडते तसेच आता माऊ आणि ACP सिद्धांत भोसलेची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान करत आहे. 

या मालिकेत काही दिवसांपूर्वीच त्याची एंट्री झाली आहे तरी त्याने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच मनं जिंकली आहेत.ACP सिद्धांत भोसलेच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगयच झालं तर अभिनेता सिद्धार्थ खिरिड हा मुळचा पुण्याचा आहे . त्याचा जन्म २८ जून १९९० मध्ये पुण्यात झाला. त्याने त्याच कॉलेजच शिक्षण ब्रिहान महाराष्ट्र कॉलेज मधून घेतल असुन, पुणे युनिव्हर्सिटीमधून त्याने ग्रॅजुएशन पुर्ण केल आहे. सिद्धार्थ हा अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो एक उत्तम डान्सर देखील आहे. तो सोशल मीडियावर त्याचे डान्सचे व्हिडिओ नेहमी पोस्ट करताना दिसतो.

२०१८ मध्ये छोट्या पडद्यावरील ‘जाडूबाई जोरात’ या मालिकेद्वारे त्याने कलाक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘फ्रेशर्स’ आणि ‘एक होती राजकन्या’ या मालिकांमध्ये कामं केलं..‘एक होती राजकन्या’ या मालिकेत देखील त्याने पोलीसाची भूमिका साकारली होती. आणि आता तो आपल्याला मुलगी झाली हो मालिकेत ACP सिद्धांत भोसलेची भूमिका साकारताना दिसत आहे.

Web Title: Know things about mulagi zali ho fame siddharth khiradi