‘माझा होशिल ना’मधील ‘पिंट्या मामा’ची पत्नी देखील आहे अभिनेत्री; वाचा, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:00 IST2021-08-01T17:52:48+5:302021-08-01T18:00:59+5:30

‘माझा होशिल ना’ मालिकेतील पिंट्या मामा सर्वात जास्त खोडकर आणि मस्ती करणारा मामा. पिंट्या मामा बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

know about majha hoshil na serial pintya mama aka nikhil ratnaparkhi | ‘माझा होशिल ना’मधील ‘पिंट्या मामा’ची पत्नी देखील आहे अभिनेत्री; वाचा, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी

‘माझा होशिल ना’मधील ‘पिंट्या मामा’ची पत्नी देखील आहे अभिनेत्री; वाचा, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी

ठळक मुद्देत्याने नारबाची वाडी, व्हेंटिलेटर, सुपरस्टार यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर  अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे.

‘माझा होशिल ना’ (Majha Hoshil Na) ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची प्रचंड पसंती मिळवली. मामा-भाच्याचे नातेसंबंध आणि त्या भाच्याची प्रेमकहाणी असे कथानक असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.  या मालिकेतील सगळ्याच भूमिका रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. सई आणि आदित्यची तर सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  मालिकेतील चार मामांचीही चर्चा कमी नाही. यातील एक छोटा मामा म्हणजे पिंट्या मामा सर्वात जास्त खोडकर आणि मस्ती करणारा मामा. आज आम्ही पिंट्या मामाची भूमिका साकारणा-या अभिनेत्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  

तर मालिकेतील खोडकर  पिंट्या मामाची भूमिका साकारली आहे ती निखिल रत्नपारखी (Nikhil Ratnaparkhi) या अभिनेत्याने. निखिल रत्नपारखी त्याच्या कॉमेडी टायमिंगमुळे आणि विशिष्ट शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. निखिलने मराठीतच नाही तर हिंदी, इंग्लिश आणि तमिळ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. निखिलचा जन्म पुण्यात झाला.

त्याची बायको ही सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचं नाव भक्ती रत्नपारखी आहे. सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका ‘अग्गंबाई सासू बाई’ या मालिकेत भक्ती काम करत आहे.

या मालिकेपुर्वी अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्ये तिने काम केले आहे.  कॉमेडीची बुलेट ट्रेन या रिअ‍ॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहोचली. याशिवाय तिने ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेतही महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

 निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘ओ माय गॉड’ या हिंदी सिनेमात त्याला तुम्ही बघितलेच असेल. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत त्याने या सिनेमात स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय पहेली,जयंताभाई कि लव्हस्टोरी यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्याने नारबाची वाडी, व्हेंटिलेटर, सुपरस्टार यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर  अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे.

Web Title: know about majha hoshil na serial pintya mama aka nikhil ratnaparkhi