खतरों के खिलाडी 14 च्या विजेत्याचे नाव समोर! ट्रॉफीसह मिळणार 'हे' स्पेशल prize

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:18 IST2024-09-19T13:16:53+5:302024-09-19T13:18:24+5:30

खतरों के खिलाडी 14 च्या विजेत्याचे नाव समोर आलं आहे.

KKK 14 Winner | Khatron Ke Khaildi 14 Winner Name Surfaces Social Media Not Gashmeer mahajani but Karanveer Mehra wins Rohit Shetty show | खतरों के खिलाडी 14 च्या विजेत्याचे नाव समोर! ट्रॉफीसह मिळणार 'हे' स्पेशल prize

खतरों के खिलाडी 14 च्या विजेत्याचे नाव समोर! ट्रॉफीसह मिळणार 'हे' स्पेशल prize

Khatron Ke Khiladi 14 Winner : 'खतरों के खिलाडी 14' (Khatron Ke Khiladi 14 ) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याच (Khatron Ke khiladi 14 Grand Finale) शुटिंग पार पडल आहे.  हा एक स्टंटवर आधारित कार्यक्रम आहे. या सिझनचा विजेता कोण असणार याबाबच सर्वांनाच उत्सुकता आहे.  अशातचं विजेत्याचं  विजेत्याचे नाव समोर आले आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा कार्यक्रम होस्ट करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा करत आहेत. मात्र,  फिनाले स्ट्रीम होण्याआधीच आता सोशल मीडियावर विजेत्या स्पर्धकाचे नाव व्हायरल होत आहे.   करणवीर मेहरा शोचा विजेता ठरल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, शोमधून अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  


करणवीर मेहराने 'खतरों के खिलाडी 14' ची ट्रॉफी आणि बक्षीस रक्कम आपल्या नावे केल्याचं बोललं जात आहे.  ट्रॉफीशिवाय एक कारही विजेत्याला दिली जाणार आहे.  करणवीर मेहरा नाही तर गश्मीर महाजनी जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा होती. गश्मीर शो जिंकण्यासाठी पात्र होता, असं काही युजर्संनी म्हटलं आहे. हा शो कलर्स टीव्हीसह जिओ सिनेमावर देखील प्रसारित होतो. यावेळी शोचे संपूर्ण शूटिंग रोमानियामध्ये झाले आहे.


सेमी फिनालेचे शुटिंग हे रोमानियामध्ये झाले, पण, नेहमीप्रमाणे ग्रँड फिनाले मुंबईत पार पडला. फिनालेमध्ये खास पाहुणे आले. शोच्या फिनाले शूटमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना सहभागी झाले. आलियाचे 'खतरों के खिलाडी 14' स्पर्धकांसोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत. दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोहित शेट्टीच्या शोचा भाग असणार आहेत. आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा जिगरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: KKK 14 Winner | Khatron Ke Khaildi 14 Winner Name Surfaces Social Media Not Gashmeer mahajani but Karanveer Mehra wins Rohit Shetty show