किश्वरचा कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:53 IST2016-06-14T08:23:07+5:302016-06-14T13:53:07+5:30

हर मुश्किल का हल अकबर बिरबल या मालिकेत किश्वर मर्चंटचा कमबॅक होणार आहे. या मालिकेच्या याआधीच्या सिझनमध्ये किश्वरने उर्वषी ...

Kishwar's Comeback | किश्वरचा कमबॅक

किश्वरचा कमबॅक

मुश्किल का हल अकबर बिरबल या मालिकेत किश्वर मर्चंटचा कमबॅक होणार आहे. या मालिकेच्या याआधीच्या सिझनमध्ये किश्वरने उर्वषी ही भूमिका साकारली होती. उर्वशी ही दिसायला अतिशय सुंदर आणि खूप चांगली नर्तिका असून तिची निवड अकबर बादशहाने राजनर्तिकी म्हणून केलेली आहे असे दाखवण्यात आले होते. या पर्वातही ती उर्वशी म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या राजनर्तिकीच्या प्रेमात बिरबल पडणार आहे तर सलीम आणि वासूदेखील तिला आपल्याकडे आकर्षित करण्याची एकही संधी सोडणार नाही. या सगळ्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. किश्नर या मालिकेत काम करण्यासाठी खूप उत्सुक असून तिने चित्रीकरणाला सुरुवातही केलेली आहे. या आधीच्या सिझनमध्येही किश्वरने काम केल्यामुळे पुन्हा त्याच कलाकारांसोबत काम करण्याचा खूप आनंद होत असल्याचे ती सांगते. 

Web Title: Kishwar's Comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.