​ढाई किलो प्रेम या मालिकेत लवकरच किश्वर मर्चंटची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 14:01 IST2017-03-16T08:31:49+5:302017-03-16T14:01:49+5:30

ढाई किलो प्रेम या मालिकेची निर्मिती एकता कपूरने केली असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेहेरझाना माझ्दा ...

Kishwar Merchant's entry soon in this series of 2.5 Kg Love | ​ढाई किलो प्रेम या मालिकेत लवकरच किश्वर मर्चंटची एंट्री

​ढाई किलो प्रेम या मालिकेत लवकरच किश्वर मर्चंटची एंट्री

ई किलो प्रेम या मालिकेची निर्मिती एकता कपूरने केली असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेहेरझाना माझ्दा आणि अंजली आनंद या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पण त्याचसोबत मालिकेच्या स्टारकास्टमध्ये आणखी एका सेलिब्रेटीची भर पडली आहे. प्रेक्षकांची एक लाडकी अभिनेत्री या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
ब्रम्हराक्षस या मालिकेत किश्वर मर्चंट दुहेरी भूमिकेत झळकली होती. ही मालिका संपल्यानंतर किश्वर कोणत्या मालिकेत दिसणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. आता किश्वर ढाई किलो प्रेम या मालिकेत काम करणार आहे. सौंदर्याच्या समाजमान्य व्याख्येत न बसणाऱ्या दोन व्यक्तींची कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता किश्वर एका छोट्याशा भूमिकेत दिसणार असून ही भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची असणार आहे. किश्वर या मालिकेत काम करण्यास खूप उत्सुक आहे. कारण कित्येक महिन्यांनंतर या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर परतत आहे. 
ढाई किलो प्रेम या मालिकेचा नायक पियूष हा आग्रा येथे राहाणारा अतिशय सामान्य मुलगा दाखवला असून त्याची नायिका दीपिका ही स्वच्छंदी आणि आनंदी स्वभावाची मुलगी आहे. अत्यंत विरोध स्वभावाच्या पियूष आणि दीपिकाची ही कथा आहे. या मालिकेत पियूषची भूमिका मेहेरझाना माझ्दा तर दीपिकाची भूमिका अंजली आनंद साकारत आहे. पियुष अतिशय साधा असल्याने त्याचा स्वतःवर विश्वास नाहीये आणि त्यामुळे आपल्यातील दोष झाकण्यासाठी तो त्याच्या मतानुसार परिपूर्ण असलेल्या दीपिकाशी लग्न करतो अशी या मालिकेची कथा आहे. 

Web Title: Kishwar Merchant's entry soon in this series of 2.5 Kg Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.