Bigg Boss Marathi 2 : अरे बापरे! काय सांगता, किशोरी शहाणे बनल्या बिचुकलेच्या आई ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:59 IST2019-08-08T14:41:20+5:302019-08-08T14:59:34+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले पाहुणे सदस्यांना आज एक मजेदार टास्क देणार आहेत. आणि या टास्कमुळे घरातील वातावरण जरा हलक होणार आहे.

Kishori shahane became a mother of abhijeet bichkule in bigg boss marathi house | Bigg Boss Marathi 2 : अरे बापरे! काय सांगता, किशोरी शहाणे बनल्या बिचुकलेच्या आई ?

Bigg Boss Marathi 2 : अरे बापरे! काय सांगता, किशोरी शहाणे बनल्या बिचुकलेच्या आई ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले पाहुणे सदस्यांना आज एक मजेदार टास्क देणार आहेत. आणि या टास्कमुळे घरातील वातावरण जरा हलक होणार आहे.  संजय नार्वेकर यांनी किशोरी शहाणे यांना सांगितले  टास्कमध्ये तुम्ही बिचुकलेंची आई आणि ते तुमची मुलगी. हे ऐकल्यावर बिचुकले यांना आश्चर्याचा धक्का बसला.. इतकेच नसून पुढे संजय नार्वेकर म्हणाले यांना दोन वेण्या घालून शाळेमध्ये पाठवायचे आहे.. यावर मात्र बिचुकले म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे असे नको.” त्यावर सगळ्यांचे म्हणणे पडले मग काय झालं... किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना वेण्या घालून दिल्या.

 बिचुकले किशोरी ताईन म्हणाले, “आई तू मला शाळेमध्ये घालतेस ?” पण हे जरा वेगळे दिसत आहे... हे म्हणून त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. “आई माझ्या लग्नाची ग का तुलाच झाली घाई”... तर किशोरी यांचे म्हणणे पडले लग्न नाही शाळा… त्या पुढे म्हणाल्या त्यांचे असे म्हणणे आहे त्यांना या घरामध्ये आल्यावर गाणीच आठवत नाहीये हो ना अस्मी”? या टास्कमध्ये सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली... पुढे अजून काय काय झाले हे आज रात्री कळेल. 

Web Title: Kishori shahane became a mother of abhijeet bichkule in bigg boss marathi house