कुलस्वामिनी मालिकेच्या सेटवर किशोरी आंबियेंना मिळाली खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 12:54 IST2017-06-30T07:24:30+5:302017-06-30T12:54:30+5:30

कुलस्वामिनी या मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या ऑनस्क्रीन पतीकडून एक खास गिफ्ट मिळाले आहे. या मालिकेत किशोरी आंबिये एक महत्त्वाची ...

Kishori Ambienza received a special gift on the set of Kalswami series | कुलस्वामिनी मालिकेच्या सेटवर किशोरी आंबियेंना मिळाली खास भेट

कुलस्वामिनी मालिकेच्या सेटवर किशोरी आंबियेंना मिळाली खास भेट

लस्वामिनी या मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या ऑनस्क्रीन पतीकडून एक खास गिफ्ट मिळाले आहे. या मालिकेत किशोरी आंबिये एक महत्त्वाची भूमिका साकारतात.  
कुलस्वामिनी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून या मालिकेची टीम म्हणजे एखाद्या कुटुंबासारखीच बनली आहे. या मालिकेच्या सेटवर नेहमीच कलाकार धमाल मस्ती करत असतात. तसेच इथे आनंदाचे क्षण नेहमीच धुमधडाक्यात साजरे केले जातात. तसेच अडचणीच्या काळात त्यांना एकमेकांचे सहकार्य देखील मिळते. कोणाचा वाढदिवस असेल तर एक वेगळेच वातावरण मालिकेच्या सेटवर पाहायला मिळते. वाढदिवस साजरा करण्यासाठी तर उत्साहाला पारावार नसतो. 
अभिनेत्री किशोरी आंबिये यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांचा वाढदिवस या मालिकेच्या सेटवर खूपच चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला. किशोरी आंबिये यांनी यावेळी गिफ्ट म्हणून डिजिटल पेंटिंग देण्यात आली. या वेळी त्यांचीच छबी डिजिटल पेंटिंगच्या रूपाने त्यांना भेट म्हणून देण्यात आली. ही अनोखी भेट पाहून किशोरीताई खूप आनंदून गेल्या होत्या. मालिकेच्या टीमने त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला होता. तसेच सेटवर त्यांच्यासाठी केकदेखील आणला होता. यामुळे त्या खूपच खूश झाल्या होत्या. कुलस्वामिनी या मालिकेत त्यांच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या प्रशांत चौडप्पा यांनी त्यांना ही डिजिटल पेंटिंग भेट म्हणून दिली होती. ऑनस्क्रीन पतीकडून मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी खूपच खास ठरली. 
आस्तिक नास्तिक संघर्षाची ही नवी कहाणी असलेली 'कुलस्वामिनी' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. 

Kishori Ambiye

Web Title: Kishori Ambienza received a special gift on the set of Kalswami series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.