किरण माने चित्रपटात साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाले - "काळजाच्या जवळचा विषय!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:25 IST2023-12-01T12:25:32+5:302023-12-01T12:25:49+5:30
Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले.

किरण माने चित्रपटात साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाले - "काळजाच्या जवळचा विषय!"
बिग बॉस मराठीच्या घरातून लोकप्रिय झालेले अभिनेता किरण माने सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. ते सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. ते लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. यात त्यांची निगेटिव्ह भूमिका असणार आहे.
किरण माने यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ..लवकरच येतोय. नवी भुमिका आणि नवा सिनेमा घेऊन. भुमिका नकारात्मक पण कलाकृतीचा आशय लैच सकारात्मक. तुम्हा-आम्हाला सलणारा... दुखणारा... खुपणारा... आपल्या रोजच्या जगण्याशी नाळ असलेला... काळजाच्या जवळचा विषय ! निर्माता, दिग्दर्शक, सहकलावंत...सगळेच लै भारी, विशेष म्हणजे मातीशी नाळ जोडलेले आणि कलाकृतीबद्दल पॅशनेट असलेले. ते कोण आहेत? विषय काय आहे? सगळ्याची उत्तरं मिळतील... लवकरच. स्टे ट्युन.
अभिनेता किरण माने यांनी अनेक मालिकांमधून काम केले आहे. मात्र मुलगी झाली हो मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर बिग बॉसमुळे ते घराघरात पोहोचले. मुलगी झाली हो मालिकेतील वादाच्या पार्श्वभूमीवर किरण माने खूपच चर्चेत आले होते. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत पाहायला मिळत आहेत.