ज्युलिया रॉबर्ट्सचा जबरा फॅन! किरण मानेंची पोस्ट व्हायरल; म्हणाले, 'तिलाच शोधत होतो अन्...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:39 PM2023-07-17T12:39:07+5:302023-07-17T12:39:56+5:30

सातारचे किरण माने हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे जबरा फॅन आहेत बरं का.

kiran mane marathi actor is hug fan of hollywood actress julia roberts shares post | ज्युलिया रॉबर्ट्सचा जबरा फॅन! किरण मानेंची पोस्ट व्हायरल; म्हणाले, 'तिलाच शोधत होतो अन्...'

ज्युलिया रॉबर्ट्सचा जबरा फॅन! किरण मानेंची पोस्ट व्हायरल; म्हणाले, 'तिलाच शोधत होतो अन्...'

googlenewsNext

'बिग बॉस' फेम किरण माने (Kiran Mane) नेहमी आपल्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधून घेतात. वैयक्तिक आयुष्यातले किस्से, आलेले अनुभव ते शेअर करत असतात. तसंच समाजातील घडामोडींवरही परखड शब्दात भाष्य करत असतात. मूळचे सातारचे असलेले किरण माने 'बिग बॉस'मधून बाहेर पडले आणि नंतर नाटक सिनेमात व्यस्त झाले. तर आपले सातारचे किरण माने हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे (Julia Roberts) जबरा फॅन आहेत बरं का. नुकतंच त्यांनी केलेल्या पोस्टमधून हे समोर आलंय.

ते लिहितात,

"तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं का?" ज्यूलीया राॅबर्टसला त्या मुलाखत घेणार्‍यानं विचारलं... मी सरसावून टीव्हीपुढं बसलो... मनातल्या मनात म्हटलं 'येड्या कुणाला विचारतोयस कळतंय का?'..पण त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून भिरकीटच झालो ! ती म्हणाली, "मी माणूस म्हणून चांगली आहे-संवेदनशील आहे.. आणि असं असणं माझ्या दृष्टीनं सेक्सी असण्यापेक्षा खूपच महत्त्वाचं आहे. कारण शरीर हे सुकतं. थकतं. 'सेक्सीपण' हे प्रत्येकाचं पर्सनल मत असतं. ते वेगळं असू शकतं."

या 'प्रिटी वूमन'चा आधीपासून जबरा फॅन होतोच, पण ही मुलाखत ऐकल्यानंतर आणि तिची बायोग्राफी वाचल्यानंतर तर आणखीनच फॅन झालो. ज्या मुलीला अभिनयक्षेत्रात मनापासुन,दीर्घकाळ आणि गांभीर्यानं करीयर करायचंय तिनं ज्युलीयाचा संघर्ष अभ्यासावा असा आहे. नाट्यवेडासाठी नाटकमंडळी चालवणार्‍या तिच्या वडिलांकडे पैशांची कायम चणचण. गरीबीचं टोक सांगताना ती म्हणते, माझ्या जन्मानंतर हाॅस्पीटलचं बील भरायला वडिलांकडं पैसे नव्हते ! स्ट्रगलच्या काळात कधी चप्पलच्या दुकानात सेल्सगर्ल तर कधी हाॅटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करावं लागलं. चार पैसे मिळतात म्हणून 'क्राईम स्टोरी' सारख्या टीव्ही मालिकेत काम करणार्‍या या मुलीनं नंतर ऑस्कर अवाॅर्डपर्यन्त मजल मारली. एका सिनेमासाठी वीस मिलीयन डाॅलर्स घेणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. हा प्रवास कुणालाही प्रेरणा देईल असाच आहे. यासाठीच 'मोनालिसा स्माईल'वाल्या 'अमेरीका'ज स्विटहार्ट'ला माझ्या काळजात कायम एक वेगळं स्थान आहे !

पहिल्यांदा लंडनला गेलोवतो तेव्हा मादाम तुसादमध्ये पाऊल ठेवल्यापासुन तिला शोधत होतो...सापडल्या-सापडल्या आमच्या भेटीची आठवण कॅमेर्‍यात 'खच्च्चॅक' करून कैद केली.. ती एक जुनी आठवण आज फेसबुकनं वर काढली...

- किरण माने.

किरण माने यांनी मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 'ऑन ड्युटी 24 तास', 'कान्हा', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय 'माझ्या नव-याची बायको', 'पिंपळपान', 'भेटी लागी जीवा', 'मुलगी झाली हो' अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.

Web Title: kiran mane marathi actor is hug fan of hollywood actress julia roberts shares post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.