'तो मला पनवती म्हणाला...', 'खुप्ते तिथे गुप्ते'मध्ये 'तो' अनुभव सांगताना श्रेयस तळपदे झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:09 IST2023-06-06T19:04:45+5:302023-06-06T19:09:15+5:30
'खुपते तिथे गुप्ते'मध्ये श्रेयस तळपदे त्याची एका ऑडिशनमधील आठवण सांगताना भावूक झाला.

'तो मला पनवती म्हणाला...', 'खुप्ते तिथे गुप्ते'मध्ये 'तो' अनुभव सांगताना श्रेयस तळपदे झाला भावूक
अवधुत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सेलिब्रिटींपासून राजकारणी मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सहभागी होतना दिसतायेत. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता
दुसऱ्या एपिसोडचा ही प्रोमो समोर आला आहे. दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. साऊथच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनला आवाज दिल्याने त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत त्याने यशवर्धन चौधरीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी यशच्या भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं होतं. आता श्रेयस खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसणार आहे.
'झी' मराठीच्या सोशल मीडिया पेजवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये श्रेयसच्या ऑडिशन दरम्यानची आठवण सांगताना दिसतोय. श्रेयस म्हणतोय, मला एका ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात कॅमेरामन मला म्हणाला थांब थांब काहीतरी प्रोब्लेम झाला.
यात अर्धा तास निघून गेला पण कॅमेरा काही सुरु होईना.तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला 'पनौती है ये' असं श्रेयसने सांगितलं. पुढे श्रेयस त्याला म्हणाला, असेन कदाचित माहिती नाही कारण त्यादरम्यान माझ्याकडे काही कामचं नव्हतं. असं या प्रोमोमध्ये श्रेयस म्हणताना दिसतोय.