“माझ्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी…,” ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 18:16 IST2023-05-22T18:13:35+5:302023-05-22T18:16:08+5:30

अभिनेत्रीने सांगितले, हा टास्क तिच्यासाठी एखाद्या भीतिदायक स्वप्नापेक्षा कमी नव्हता.

khatron ke khiladi 13 contestant nyrraa banerji gets deep cut wounds on private parts during task | “माझ्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी…,” ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत

“माझ्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी…,” ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत

 रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'च्या 13व्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम चित्तथरारक स्टंट्सनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची १२ पर्वं पूर्ण झाली आहेत. आता १३वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.  अलीकडेच ऐश्वर्या शर्माने सांगितले की, तिला स्टंट करताना खूप दुखापत झाली होती. आता आणखी एक स्पर्धक आहे जी 'खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट केल्यानंतर गंभीर जखमी झाली आहे.

साउथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये या शोचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे आणि शूटिंगनंतर सर्व स्पर्धक त्यांचे अपडेट्स शेअर करत आहेत. यामध्ये हिंदी टेलिव्हिजनमधील अनेक आघाडीचे कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. आता अभिनेत्री नायरा बॅनर्जीही यात सहभागी झाली आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तिला बरीच दुखापत झाल्याचं कळतंय. 

एका मुलाखती दरम्यान नायरा म्हणाली, एक स्टंट करताना आमच्या अंगावर किडे सोडण्यात आले होते. माझ्या संपूर्ण शरीरावर किडे चढले आणि मला चावले. त्या किड्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना गंभीर दुखापत केली आहे. पण आता त्या जखमा बऱ्या होत आहेत.हा टास्क माझ्यासाठी एखाद्या भीतिदायक स्वप्नापेक्षा कमी नव्हता.” चाहते तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी तिला सोशल मीडियावरून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

'खतरों के खिलाडी 13' च्या रिलीजच्या तारखेची अधिकृत माहिती निर्मात्यांनी शेअर केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो जुलैच्या मध्यात सुरू होईल. डेझी शाह, शिव ठाकरे, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, नायरा बॅनर्जी, अजित तनेजा, रोहित रॉय, सौंदर मौफकीर, शीजन खान, अर्चना गौतम, अंजली आनंद, ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स आणि रश्मित कौर हे कलाकार परफॉर्म करताना दिसणार आहेत. 

Web Title: khatron ke khiladi 13 contestant nyrraa banerji gets deep cut wounds on private parts during task