Khatron Ke Khiladi 10 : भारती सिंगच्या पतीची 'या' अभिनेत्रीसह वाढते जवळीक, पतीचा हा कारनामा पाहून ढसा ढसा रडली कॉमेडी क्वीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:24 IST2020-03-03T13:52:07+5:302020-03-03T15:24:31+5:30
हर्ष हा लेखक असून त्याने काही कॉमेडी शोजसाठी लेखक म्हणून काम केले आहे.

Khatron Ke Khiladi 10 : भारती सिंगच्या पतीची 'या' अभिनेत्रीसह वाढते जवळीक, पतीचा हा कारनामा पाहून ढसा ढसा रडली कॉमेडी क्वीन
टीव्ही इंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन भारती सिंह सध्या नाराज आहे. तिच्या नाराजीचे कारण आहे तिचा पती हर्ष लिंबाचिया आहे. होय, हर्ष हा ‘खतरों के खिलाडी पर्व १०’ मध्ये सहभागी झाला आहे. शोमध्ये त्याची कामगिरी पाहाता त्याला रसिकांची पसंती देखील मिळत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक एकमेकांचे प्रतिस्पर्धक असतात. मात्र हर्षची एका स्पर्धकाची वाढती जवळीक पाहाता भारतीच्या पाया खालची जमीन सरकली अशीच अवस्था झाली आहे. सतत हर्ष अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत मजा मस्ती करताना दिसतो.
इतकेच नाही तर शोदरम्यान हर्षने करिश्माला दुसऱ्या लग्नासाठी प्रपोज केले आहे. करिश्माला टास्कच्या दरम्यान हर्ष तिला सपोर्टही करतो. करिश्मा आणि हर्षमध्ये मैत्रीचे हे नाते पाहून भारती मात्र खूप पझेसिव्ह झाली आहे.दुस-यांदा लग्न केले तर करिश्मासोबतच करणार हे ऐकून तर भारतीची झोपच उडाली आहे.
स्टार वन चॅनलवरील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोची भारती सेकंड रनअरप होती. या शोमुळेच प्रकाश झोतात आलेली भारती नंतर अनेक टीव्ही शोमध्ये कॉमेडी स्कीट आणि होस्ट करताना दिसली.'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाईट बचाव', 'झलक दिखला जा' 'इंडियाज गॉट टॅलेंट' अशा विविध रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. भारती सिंह एक उत्तम कलाकारा कॉमेडी क्वीन म्हणूनही ओळखली जाते.हर्ष हा लेखक असून त्याने काही कॉमेडी शोजसाठी लेखक म्हणून काम केले आहे.