'खजूर' बनणार 'खजूरी' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 14:32 IST2016-10-01T09:02:01+5:302016-10-01T14:32:01+5:30
'द कपिल शर्मा' शोचं खास आकर्षण म्हणजे या शोमधील पुरुष कलाकारांकडून धारण केला जाणार स्त्रीवेश. गुत्थी, पलक ही स्त्री ...

'खजूर' बनणार 'खजूरी' !
' ;द कपिल शर्मा' शोचं खास आकर्षण म्हणजे या शोमधील पुरुष कलाकारांकडून धारण केला जाणार स्त्रीवेश. गुत्थी, पलक ही स्त्री पात्रं रसिकांमध्ये हिट झालीत. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. कार्तिकेय राज याचं. द कपिल शर्मा शोमध्ये कार्तिकेय खजूर ही प्रसिद्ध व्यक्तीरेखा साकारतोय. मात्र आगामी शोमध्ये कार्तिकेय खजूर नाही तर खजूरी बनणार आहे. कार्तिकेय आता स्त्रीपात्र साकारणार आहे. फोर्स-2 सिनेमाची टीम द कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. यावेळी खजूरचा खजूरी झाल्याचं रसिकांना पाहायला मिळणार आहे.