किथ आणि मिनिषाची जोडी झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:00 IST2016-07-13T06:30:59+5:302016-07-13T12:00:59+5:30
बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा लवकरच छोट्या पड्यावर झळकणार आहे. निर्माता सिद्धार्थ मल्होत्रा हा पूर्वी सिनेविस्ताज या प्रोडक्शन हाऊसचा एक ...

किथ आणि मिनिषाची जोडी झळकणार
ब लिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा लवकरच छोट्या पड्यावर झळकणार आहे. निर्माता सिद्धार्थ मल्होत्रा हा पूर्वी सिनेविस्ताज या प्रोडक्शन हाऊसचा एक भाग होता. पण त्याने आता नुकतेच स्वतःचे वेगळे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या मालिकेत मिनिषा लांबा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रतीका राव, करण वाही आणि किथ सिक्युरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बिग बॉस या कार्यक्रमामुळे किथ हा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सिद्धर्थ मल्होत्राच्या या नव्या मालिकेत मिनिषा लांबा आणि किथ ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
![]()