क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७'मध्ये विचारलेल्या १२ लाख ५० हजाराच्या 'या' प्रश्नाचं उत्तर माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:02 IST2025-09-26T08:59:39+5:302025-09-26T09:02:49+5:30
तुम्हीही क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७' मध्ये क्रिकेटसंबंधी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर माहितीये? बातमीवर क्लिक करुन घ्या जाणून

क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७'मध्ये विचारलेल्या १२ लाख ५० हजाराच्या 'या' प्रश्नाचं उत्तर माहितीये?
'परिस्थिती प्रत्येकाची सारखीच असते, पण प्रत्येकाचे धाडस वेगळे असते. कोणी संघर्षातून बाहेर पडतो, तर कोणी त्यात दबून जातो, अशा टॅगलाईनखाली सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) नवीन पर्वाची चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या खास सूत्रसंचालनाने पुन्हा एकदा सहभागी स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अशातच 'केबीसी १७'च्या २५ सप्टेंबरच्या भागात स्पर्धकाला क्रिकेटसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यासाठी स्पर्धकाने लाईफलाईनचा वापर केला. काय होता तो प्रश्न?
क्रिकेटवरील १२.५० लाखांचा प्रश्न काय होता?
'केबीसी १७'मध्ये १२ लाख ५० हजारांचा प्रश्न पुढीलप्रमाणे, मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये एमआय न्यूयॉर्क टीमचा भाग असलेला, अग्नी हा कोणत्या हिंदी चित्रपट दिग्दर्शकाचा मुलगा आहे? पर्याय: A. राजीव राय B. राजकुमार संतोषी C. नितेश तिवारी D. विधु विनोद चोप्रा. उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने 'ऑडियन्स पोल' लाइफलाइनचा वापर केला. शोमधील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी 'D. विधु विनोद चोप्रा' हा पर्याय निवडला. त्यामुळे प्रेक्षकांच्या मतावर विश्वास ठेवून स्पर्धकाने तेच उत्तर दिलं, जे बरोबर ठरलं. परंतु नंतर २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने स्पर्धकाला फक्त ५ लाख रुपये विजयी रक्कम मिळाली.
त्याआधी सहभागी स्पर्धकाला ५ लाखांचा, १० वा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न होता की, जून २०२५ मध्ये, मध्य पूर्वेतून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने यापैकी कोणत्या मिशनचे नेतृत्व केले होते? पर्याय: A. ऑपरेशन गंगा B. ऑपरेशन यमुना C. ऑपरेशन सिंधू (स्पर्धकाचे उत्तर) D. ऑपरेशन ब्रह्मपुत्र. स्पर्धकाने कोणताही धोका न पत्करता पर्याय 'C. ऑपरेशन सिंधू' निवडला, जो अगदी योग्य होता. अशाप्रकारे स्पर्धकाने हुशारीने खेळ करत २५ लाखांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली होती. परंतु उत्तर चुकल्याने तिला फक्त ५ लाख रुपये मिळाले.