KBC 17: 'रामायणा'संबंधी ७ लाखांचा सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक गोंधळली, तुम्हाला माहितीये का उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:14 IST2025-10-03T15:10:52+5:302025-10-03T15:14:58+5:30
'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये रामायणासंबंंधीचा सोपा प्रश्न विचारण्यात आला तरीही स्पर्धक गोंधळली. तुम्हाला माहितीये का उत्तर

KBC 17: 'रामायणा'संबंधी ७ लाखांचा सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक गोंधळली, तुम्हाला माहितीये का उत्तर?
सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती १७' (Kaun Banega Crorepati 17) या लोकप्रिय गेम शोमध्ये नुकताच एक अत्यंत रंजक एपिसोड टेलिकास्ट झाला. या एपिसोडमध्ये रामायणावर आधारित एका प्रश्नाने हॉटसीटवरील स्पर्धकाला गोंधळात टाकले, तर दुसऱ्या एका स्पर्धकाने या सीझनमधील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला. जाणून घ्या काय घडलं?
रामायणाशी संबंधित प्रश्न
'कौन बनेगा करोडपती १७'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात श्रद्धा नावाच्या स्पर्धक हॉटसीटवर होत्या. ७.५० लाख रुपयांसाठी त्यांना 'रामायण'शी संबंधित एक प्रश्न विचारला गेला. तो प्रश्न पुढीलप्रमाणे- वाल्मिकी रामायणनुसार, भगवान राम यांनी सुग्रीवाला प्रतिज्ञेची आठवण करून देण्यासाठी कोणातर्फे निरोप पाठवला होता? A) हनुमान, B) लक्ष्मण, C) अंगद, D) भरत. हा प्रश्न पाहून श्रद्धा गोंधळल्या आणि त्यांनी कोणतीही रिस्क न घेता 'ऑडियन्स पोल' या लाइफलाईनचा वापर केला. त्याचवेळी त्यांनी बिग बींकडेही मदत मागितली.
अमिताभ बच्चन यांनी त्यांना हिंट दिली की, "ही ती व्यक्ती आहे जी भगवान रामासोबत वनवासात होती." त्यानंतर प्रेक्षकांची मतं आणि अमिताभ बच्चन यांच्या हिंटच्या आधारावर श्रद्धा यांनी (B) लक्ष्मण हा पर्याय लॉक केला, जो अगदी बरोबर निघाला.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यानंतर श्रद्धा आत्मविश्वासाने खेळत राहिल्या. त्या २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या, मात्र तिथे त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला आणि ₹१२.५० लाख इतकी रक्कम जिंकून त्या सन्मानाने घरी परतल्या.