मालिकांच्या शीर्षक गीतांच्या गायकांच्या यादीत आणखीन एका नावाची भर, कविता रामने गायले 'बाजी'चे शीर्षक गीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 18:02 IST2018-08-10T18:00:32+5:302018-08-10T18:02:19+5:30

झी मराठीवर नुकतीच दाखल झालेली मालिका 'बाजी'चे शीर्षक गीत कविता राम यांनी गायले आहे.

Kavita Ram sing title track of Baji serial | मालिकांच्या शीर्षक गीतांच्या गायकांच्या यादीत आणखीन एका नावाची भर, कविता रामने गायले 'बाजी'चे शीर्षक गीत

मालिकांच्या शीर्षक गीतांच्या गायकांच्या यादीत आणखीन एका नावाची भर, कविता रामने गायले 'बाजी'चे शीर्षक गीत

ठळक मुद्दे'बाजी'तील ठुमरीलाही कविता राम यांनी दिला स्वरसाज'बाजी'च्या शीर्षक गीताला मिळतेय दाद

मालिकेचे शीर्षक गीत ही मालिकेची ओळख असते. या मालिकांच्या गीतांना बरेच गायक स्वरसाज देत असतात. मालिकांचे शीर्षक गीत गाणाऱ्या गायकांच्या यादीत आता आणखीन एका गायिकेच्या नावाची भर पडली आहे. ही गायिका म्हणजे हिंदी व मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या कविता राम. कविता राम यांनी झी मराठीवर नुकतीच दाखल झालेली मालिका 'बाजी'चे शीर्षक गीत गायले आहे. या शीर्षक गीताला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळते आहे. 

कविता राम यांना वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायला आवडतात. त्या म्हणाल्या की,' वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याकडे माझा जास्त कल असतो. त्यात मी ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांच्याकडे चित्रपटाच्या एका गाण्यासंदर्भात गेले होते. त्यावेळी त्यांना माझा आवाज आवडला आणि मला बाजी मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाली. झीचे टायटल ट्रॅक गायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. मालिका सुरू झाल्यानंतर दररोज माझे नाव टीव्हीवर दिसते आहे. त्यामुळे मी जास्त लोकांच्या घरात पोहचत आहे. त्यामुळे मी व माझ्या घरातील मंडळीदेखील खूप खूश आहेत. '
मला 'बाजी'चे शीर्षक गीत गायला खूप मजा आली. या शीर्षक गीतानंतर मी बाजी मालिकेतील दोन गाणीदेखील मी गायली आहेत. त्यातील एक ठुमरी नुकतेच प्रदर्शित झाली. या ठुमरीला मी स्वरसाज दिला आहे. या निमित्ताने मला वेगळ्या प्रकारचे गाणे गाण्याची संधी मिळाली. हे गाणे देखील मी वेगळ्या आवाजात गायले आहे. ही ठुमरी ऐकल्यावर काहींच्या प्रतिक्रिया आल्या. ही ठुमरी मी गायली आहे, असे लोकांना वाटत नाही. त्यासाठी खूप लोकांचे फोन आले. सोशल मीडियावर खूप शुभेच्छा व प्रतिक्रिया दिल्या, कविता यांनी सांगितले.
'बाजी' मालिकेनंतर गायिका कविता रामने आणखीन एका मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे. मात्र, आता या मालिकेबद्दल बोलणे उचित ठरणार नाही.

Web Title: Kavita Ram sing title track of Baji serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.