कुशल टंडन आणि गौहर खानचे झाले पॅचअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 16:49 IST2017-02-13T10:05:57+5:302017-02-13T16:49:56+5:30
गौहर खान आणि कुशल टंडन बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकले होते. बिग बॉसच्या घरात असताना कुशल आणि गौहर एकमेकांच्या ...

कुशल टंडन आणि गौहर खानचे झाले पॅचअप?
ग हर खान आणि कुशल टंडन बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकले होते. बिग बॉसच्या घरात असताना कुशल आणि गौहर एकमेकांच्या प्रेमात पडले. गौहर बिग बॉसच्या त्या सिझनची विजेती ठरली होती. या कार्यक्रमाच्या फिनालेलादेखील कुशल सतत तिच्यासोबत होता. त्यांची ही केमिस्ट्री पाहाता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही त्यांचे नाते टिकेल असे सगळ्यांना वाटत होते. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी ब्रेकअप केले.
कुशल आणि गौहर यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते दोघे आजही एकमेकांचे भरपूर चांगले फ्रेंड्स आहेत. पार्टी, अथवा एखाद्या कार्यक्रमात समोरासमोर आल्यावर दोघे एकमेकांशी आवर्जून बोलतात. तसेच ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर ते एकमेकांना फॉलो करतात. त्यामुळे एकमेकांच्या वाढदिवसाला अथवा एखाद्या नवीन शोच्यावेळी ते दोघे एकमेकांना नेहमीच शुभेच्छा देतात. गोहर नुकतीच स्टारडस्ट या मासिकाच्या कव्हरवर झळकली आहे. या कव्हरवरील तिचा फोटो कुशलला खूपच आवडला आहे. या मासिकाचे कव्हरपेज इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर शेअर करून त्याने तिची स्तुती केली आहे. त्याने म्हटले आहे की, हैदर खानने गौहरचा काढलेला फोटो नुकताच पाहिला. हा फोटो शेअर केल्याशिवाय मी राहूच शकलो नाही. गौहर ही दिसायला खूप छान असण्यासोबतच ती एक स्टायलिश अभिनेत्री आणि चांगल्या मनाची व्यक्तीदेखील आहे.
कुशलच्या या पोस्टवर गौहरनेदेखील त्याचे आभार मानले आहेत. गौहरने म्हटले आहे की, तू केवळ फोटो शेअरच केला नाही तर इतके सुंदर शब्द या फोटोसोबत लिहिले आहेस त्यासाठी मी तुझी आभारी आहे.
![gauhar khan]()