कॅटरिना कैफ आणि अभिषेक बच्चनची जोडी धमाल करताना दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 17:50 IST2017-10-30T06:40:36+5:302017-10-30T17:50:09+5:30

कॅटरिना कैफ  आणि अभिषेक बच्चन यांना तुम्ही मोठ्या पडद्यावर एकत्र बघितला आहेत. आता हे दोघे छोट्या पडद्यावर एकत्र धमाल ...

Katrina Kaif and Abhishek Bachchan pairing on a small screen | कॅटरिना कैफ आणि अभिषेक बच्चनची जोडी धमाल करताना दिसणार छोट्या पडद्यावर

कॅटरिना कैफ आणि अभिषेक बच्चनची जोडी धमाल करताना दिसणार छोट्या पडद्यावर

टरिना कैफ  आणि अभिषेक बच्चन यांना तुम्ही मोठ्या पडद्यावर एकत्र बघितला आहेत. आता हे दोघे छोट्या पडद्यावर एकत्र धमाल करताना दिसणार आहेत. लवकरच कॅटरिना कैफ आणि अभिषेक बच्चन फराह खानच्या रिअॅलिटी शो लिप सिंगमध्ये बॅटलमध्ये मस्ती करताना दिसणार आहे. या शोमध्ये हे दोघे आपल्या आवडत्या गाण्यावर धमाल करताना दिसणार आहेत. यामध्ये त्यांची साथ बोमन इराणीपण देणार आहे. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार या एपिसोडची शूटिंग आज होणार आहे. सूत्रांनी मिररला दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चन  तीस मार खां मधले सुपरहिट गाणं 'शीला की जीवानी'वर डान्स करताना दिसणार आहे आणि याच दरम्यान कॅटरिना कैफची स्टेजवर एंट्री होणार आहे. अभिषेकला कॅटरिना ज्वॉईन करत जबरदस्त परफॉर्मेन्स देणार आहे. अभिषेक आणि कॅटरिना धूम 3 आणि सरकार सारख्या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघे फराह खानच्या शोमध्ये दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या शोच्या रिहर्सल्स दरम्यान राजकुमार रावच्या पायाला अपघात झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. लवकरच तो बरेली कि बर्फीमधली आपल्या को-स्टार क्रिती सॅननसोबत या शोमध्ये दिसणार आहे. 

ALSO RAED :  कॅटरिना कैफच्या कडेवर असलेला ‘तो’ मुलगा कोणाचा?, खेळणेही दिले घेऊन!

कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट ख्रिसमच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल पाच वर्षांनी दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यानंतर कॅट  कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्यामुळे रणवीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे.

 

Web Title: Katrina Kaif and Abhishek Bachchan pairing on a small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.