कसौटी जिंदगी की या मालिकेतील एरिका फर्नांडिसला आवडत नाही ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:30 IST2018-09-17T12:39:39+5:302018-09-18T06:30:00+5:30

श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे तर कोमिलाकाच्या भूमिकेत ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे.

Kasautii Zindagii Kay fame Erica Fernandes hate this thing | कसौटी जिंदगी की या मालिकेतील एरिका फर्नांडिसला आवडत नाही ही गोष्ट

कसौटी जिंदगी की या मालिकेतील एरिका फर्नांडिसला आवडत नाही ही गोष्ट

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. साहजिकच या शोच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘कसौटी जिंदगी की2’ चा प्रोमो व्हिडिओ रिलीज होताच, चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. एकता कपूरने नुकताच ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो रिलीज केला. ‘पुन्हा एकदा एक शानदार प्रेम कहाणी घेऊन येतेय. मी प्रचंड उत्साहित आहे,’ असे तिने त्यासोबत लिहिले होते. हा प्रोमो रिलीज झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. केवळ इतकेच नाही तर चाहत्यांचा आनंद जणू गगणात मावेनासा झाला. 

श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे तर कोमिलाकाच्या भूमिकेत ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका तब्बल १८ वर्षांनी पुन्हा प्रसारित होणार आहे. टीव्हीवर सर्वाधिक चाहते मिळालेले अनेक कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एरिका फर्नांडिसने याआधी कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने साकारलेली सोनाक्षीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री एरिका फर्नांडिस खूपच उत्सुक आहे. या मालिकेत काम करण्याच्या तिच्या अनुभवाविषयी ती सांगते, “या मालिकेत काम करायला खूप मजा येत आहे. आपल्या अवतीभोवती पडलेला लोकांचा गराडा आणि ते तुमच्यावर करीत असलेला प्रेमाचा वर्षाव पाहून मनाला फार बरं वाटतं. पण माझी मेक-अप रूप ही अशी जागा आहे, जिथं मला एकटीलाच राहायला आवडतं. त्या माझ्या खाजगी ठिकाणी इतर कोणी आलेलं मला चालत नाही. चित्रीकरणापूर्वी मला तिथं काही काळ एकटंच राहायला आवडतं. त्यामुळे माझं मन शांत राहतं आणि मी अधिक चांगला अभिनय करू शकते.”

प्रेरणाच्या भूमिकेत प्रेक्षकांना एरिका नक्कीच आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Kasautii Zindagii Kay fame Erica Fernandes hate this thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.