कृतिका कामराला केवळ टीव्ही अभिनेत्री नाही, तर सिने अभिनेत्री व्हायचे आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 18:00 IST2017-05-09T11:33:49+5:302017-05-09T18:00:02+5:30
छोटा पडदा गाजवल्यानंतर कलाकरांना मोठ्या पडद्यावर झळकण्साचे वेध लागतात असेच काहीसे टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरालाही वाटत आहे.‘प्रेम या पहेली- ...
कृतिका कामराला केवळ टीव्ही अभिनेत्री नाही, तर सिने अभिनेत्री व्हायचे आहे!
छ टा पडदा गाजवल्यानंतर कलाकरांना मोठ्या पडद्यावर झळकण्साचे वेध लागतात असेच काहीसे टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरालाही वाटत आहे.‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका कामराच्या मते तिला विविध माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली असून प्रेक्षकांनी तिला या सार्या भूमिकांमध्ये स्वीकारले आहे. ही तिच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कृतिका कामरा सांगते, “मला टीव्ही, चित्रपट, वेब वगैरे विविध माध्यमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली असून मी त्या यशस्वीपणे पार पाडल्या. अशा प्रकारे विविध माध्यमांमध्ये भूमिका साकारून मला स्वत:चं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे, हे दाखवून द्यायचं आहे. मला माझी ओळख केवळ टीव्ही मालिकांतील अभिनेत्री इतक्यापुरती मर्यादित राखायची नसून मला पूर्ण अभिनेत्री व्हायचं आहे!”टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारणा र्या कलाकारांना प्रेक्षकांचे उदंड प्रेम तर लाभतेच,पण त्यांना भरपूर लोकप्रियता आणि पैसाही मिळतो. असे असले, तरी चित्रपटसृष्टीत टीव्हीवरील कलाकारांकडे आदराने पाहिले जात नाही, असे कृतिकाचे मत आहे. “तुम्ही टीव्ही मालिकेत अभिनय करीत असाल, तर हिंदी चित्रपटसृष्टीत असं मानलं जातं की तुम्ही तेवढंच काम करू शकता. टीव्हीवरील कलाकारांचा अभिनय कमी लेखला जातो. मला ही साचेबध्द प्रतिमा मोडून काढायची असून म्हणून मी विविध माध्यमांमध्ये भूमिका स्वीकारते,” असे कृतिका म्हणाली.‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’मध्ये कृतिकाने आपल्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असून मालिकेत राजपुत्र वीरेन्द्रसिंहची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्ना याच्याबरोबर तिची जोडी उत्तम जमल्याची प्रेक्षकांची भावना आहे.