बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल करिश्मा तन्नाचा होणारा पती आहे तरी कोण? अशी झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 10:48 IST2022-02-04T10:47:11+5:302022-02-04T10:48:15+5:30

Karishma Tanna Wedding : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना उद्या 5 फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरूण बंगेरासोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत.

Karishma Tanna Wedding Who Is Karishma Tanna Groom To Be Varun Bangera | बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल करिश्मा तन्नाचा होणारा पती आहे तरी कोण? अशी झाली होती पहिली भेट

बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल करिश्मा तन्नाचा होणारा पती आहे तरी कोण? अशी झाली होती पहिली भेट

Karishma Tanna Wedding : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna)  उद्या 5 फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरूण बंगेरासोबत (Varun Bangera ) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. करिश्मा व वरूणच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साहजिकच करिश्माचे चाहते नवरदेवाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. करिश्माचा होणारा पती कोण? हे जाणून घेण्यास फॅन्स उतावीळ झाले आहेत.

तर करिश्माचा होणारा पती वरूण बंगेरा एक बिझनेसमॅन आहे. तो मुंबईचा राहणारा असून सध्या व्हीबी क्रॉप नामक कंपनीचा डायरेक्टर आहे. वरूणचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. त्याचे 413 फॉलोअर्स आहे आणि तो स्वत: 411 लोकांना फॉलो करतो. वरूणने कॅनडाच्या ओटावा युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. 12 नोव्हेंबर 2021 रोजी करिश्मा व वरूणचा साखरपुडा झाला होता.

अशी झाली होती पहिली भेट
करिश्मा व वरूणची पहिली भेट त्यांचा कॉमन फ्रेन्ड सुवेद लोहियाच्या पार्टीत झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला. हळूहळू गप्पा, मग मैत्री आणि नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या दीड वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. 
 करिश्माबद्दल सांगायचं तर करिश्माने मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.  2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली.  

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केलं आहे. 2013 साली तिने ‘ग्रँड मस्ती’चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. रणबीर कपूरच्या ‘संजू’ या सिनेमातही ती झळकली होती.

Web Title: Karishma Tanna Wedding Who Is Karishma Tanna Groom To Be Varun Bangera