करण सिंग ग्रोव्हरने सोडली कसौटी जिंदगी की मालिका, टीमने दिला फेअरवेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:55 IST2019-10-18T19:54:24+5:302019-10-18T19:55:59+5:30
करण सिंग ग्रोव्हरने कसौटी जिंदगी की या मालिकेला रामराम ठोकला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

करण सिंग ग्रोव्हरने सोडली कसौटी जिंदगी की मालिका, टीमने दिला फेअरवेल
कसौटी जिंदगी की या मालिकेत करण सिंग ग्रोव्हर आपल्याला मिस्टर बजाज या भूमिकेत पाहायला मिळाला होता. पण आता त्याच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. त्याने या मालिकेला रामराम ठोकला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. कसौटी जिंदगी की च्या टीमने त्याला नुकताच फेअरवेल दिला असून हा फोटो त्या फेअरवेल पार्टीचा आहे.
करण सिंग ग्रोव्हरने या फोटोसोबत लिहिले आहे की, तुमच्या सगळ्यांसोबत मी खूप चांगला वेळ घालवला. मला इतका चांगला निरोप दिल्याबद्दल माझ्या या मालिकेच्या टीमचे मी आभार मानतो. तुमच्या सर्वांसोबत काम करून मला प्रचंड आनंद झाला आहे. एकता मला ही संधी दिल्याबद्दल धन्यावाद...
करण सिंग ग्रोव्हरने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याने मालिका सोडली असल्याचे आता सगळ्यांना कळले आहे. पण करणने ही मालिका का सोडली याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. करण कसौटी जिंदगी ही मालिका सोडणार असे त्याने एकता कपूरला काही दिवसांपूर्वीच कळवले होते असे म्हटले जाते. या मालिकेत नुकतीच आमना शरीफची कोमोलिकाच्या भूमिकेत एंट्री झाली असून तिचे काम प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे.
करणने कसौटी जिंदगी की ही मालिका सोडली असली तरी काही महिन्याने या मालिकेत त्याची पुन्हा एंट्री होणार असल्याचे वृत्त आजतक या वाहिनीने दिले आहे. आता करण खरंच या मालिकेत परततो की नाही हे आपल्याला लवकरच कळेल.
करण सिंग ग्रोव्हरने अनेक वर्षांनंतर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक केला होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. विशेष म्हणजे कसौटी जिंदगी या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो प्रेरणाच्या जावयाच्या भूमिकेत दिसला होता.
करणने दिल मिल गये, कबूल है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो नच बलिये, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमात देखील झळकला आहे. तसेच त्याने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.