'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:59 IST2022-11-04T16:59:33+5:302022-11-04T16:59:59+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen)च्या वैवाहिक जीवनात बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दुरावा निर्माण झाला आहे. आता या जोडप्याने ते विभक्त होणार असल्याचं जाहीर केले आहे.

Karan Mehra breaks his silence on the news of his affair with Charu Asopa | 'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन

'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen)च्या वैवाहिक जीवनात बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दुरावा निर्माण झाला आहे. आता या जोडप्याने ते विभक्त होणार असल्याचं जाहीर केले आहे. फक्त घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं नाही तर एकमेकांवर आरोपदेखील करताना दिसले. चारु असोपाने राजीव सेनवर कोणासोबत तरी अफेयर असल्याचे आरोप केले होते. तर दुसरीकडे राजीव सेनने चारू असोपावर आरोप केला की, तिचे अभिनेता करण मेहरा(Karan Mehra) सोबत अफेयर सुरू आहे. या आरोपांवर आता करणनं मौन तोडले आहे.

करण मेहराला जेव्हा समजले की राजीव सेनने चारू आणि त्याचे अफेयर असल्याचा आरोप केला. तेव्हा तो खूप भडकला. त्याने या प्रकरणात मला उगाच गोवलं जातं असल्याचं म्हटलं. जूनमध्ये एका कार्यक्रमात मी चारूशी थोडा वेळ भेटलो आणि तेव्हा आमच्यात बोलणं झालं. त्यानंतर आतापर्यंत आम्ही काहीच बोललेलो नाही. तो पुढे म्हणाला की, चारू आणि त्याने आपल्या लग्नातील समस्यांबद्दल चर्चा केली होती.


नुकतेच चारु असोपाने लेक जियानाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी मुंबईत सेन कुटुंबाकडून पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. जिथे चारू आणि राजीव सेन एकत्र दिसले होते. दोघांनी मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: Karan Mehra breaks his silence on the news of his affair with Charu Asopa