​करण कुंद्राने वाजवली रोडीजच्या स्पर्धकाच्या कानाखाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 12:23 IST2017-02-17T06:53:13+5:302017-02-17T12:23:13+5:30

एमटिव्ही रोडीज हा रिअॅलिटी शो तरुणांचा प्रचंड आवडता आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच विजेते खूप प्रसिद्ध झाले आहेत आणि ...

Karan Kundra at the sound of the competitor of the Wali Roadies? | ​करण कुंद्राने वाजवली रोडीजच्या स्पर्धकाच्या कानाखाली?

​करण कुंद्राने वाजवली रोडीजच्या स्पर्धकाच्या कानाखाली?

टिव्ही रोडीज हा रिअॅलिटी शो तरुणांचा प्रचंड आवडता आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच विजेते खूप प्रसिद्ध झाले आहेत आणि आता या कार्यक्रमाचा पुढचा सिझन लवकरच येणार असून या सिझनची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या सिझनचे नाव रोडीझ रायझिंग असे असून या सिझनमध्येदेखील करण कुंद्रा परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. पण यंदाच्या सिझनमध्ये करणचे बदललेले रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या कार्यक्रमाचे ऑडिशन्स सुरू असून या ऑडिशन्सला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण या ऑडिशन्सना हजेरी लावत आहेत. 
एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमामुळे रघू राम आणि राजीव हे दोघे चर्चेत आले होते. हे दोघेही या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या सिझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावत होते. पण ते स्पर्धकांसोबत अतिशय वाईट शब्दांत बोलायचे, तसेच त्यांचा अपमान करायचे. या सगळ्यामुळे त्यांच्या नावांची प्रचंड चर्चा झाली होती. आता त्यांची जागा करण कुंद्राने घेतली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण नुकत्याच झालेल्या ऑडिशनच्या दरम्यान करणने एका स्पर्धकाच्या चक्क कानाखाली वाजवली असे म्हटले जात आहे. तर अजून एका स्पर्धकाला त्याने धक्के मारून बाहेर काढले असेही म्हटले जात आहे. करणला खरेच इतका राग आला होता की हे सगळे त्याने टिआरपीसाठी केले आहे हा चर्चेचा विषय बनला आहे. 
कॉन्ट्रोव्हर्सीमुळे कार्यक्रमाचा टिआरपी वाढतो ही गोष्ट रोडीजच्या टीमला चांगलीच माहीत आहे. त्यामुळेच करण दोन स्पर्धकांसोबत अशाप्रकारे वागला अशी सध्या चर्चा सुरू आहे. आता करण असा का वागला हे केवळ तोच सांगू शकेन. 

Web Title: Karan Kundra at the sound of the competitor of the Wali Roadies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.