तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिप, तरी करण कुंद्रा Bumble डेटिंग अॅपवर? प्रोफाईल व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:17 IST2025-08-20T13:16:24+5:302025-08-20T13:17:08+5:30
करण कुंद्रा तेजस्वीच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिप, तरी करण कुंद्रा Bumble डेटिंग अॅपवर? प्रोफाईल व्हायरल
करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल. बिग बॉस १५ मध्ये असताना दोघं प्रेमात पडले. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या एकत्रित व्हिडिओंना लाखो व्ह्यू असतात. करण कुंद्राचे तर याआधीही अनेक रिलेशनशिप गाजले आहेत. कृतिका कामरा आणि अनुषा दांडेकरसोबत तो सीरियस रिलेशिनशिपमध्ये होता. मात्र दोघींसोबत त्याचं नातं टिकलं नाही. दरम्यान आता तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही तो बम्बल या डेटिंग अॅप वर असल्याचं समोर आलं आहे. त्याचा बम्बल अॅपवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
करण कुंद्राचं बम्बल या डेटिंग अॅपवर प्रोफाईल आहे. याचा स्क्रीनशॉट रेडिट या सोशल मीडिया साईटवर व्हायरल होतोय. याखाली एकाने कमेंट करत लिहिले, 'मी बम्बलवर अनेक व्हेरिफाईड टॅग असणारे फेक अकाऊंट्स पाहिले आहेत. या फोटोतून काहीच सिद्ध होत नाही. करण स्वत: पब्लिकली तेजस्वीसोबत नात्यात असताना बम्बल चा वापर का करेल?', 'हे नक्कीच फेक अकाऊंट आहे कारण कोणीही इतका वेडा नसतो जो रिलेशनशिपमध्ये असतानाही बम्बलवर स्वत:चा फोटो ठेवेल. ही जुनी प्रोफाईलही असू शकते'.
करण कुंद्रा तेजस्वीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे अख्ख्या जगाला माहित आहे. त्यामुळे तो बम्बलवर कसा असेल असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हे फेक अकाऊंट असल्याचीच अनेकांची प्रतिक्रिया आहे. करण आणि तेजस्वी यांच्या रिलेशनशिपला आता ३ वर्ष झाली आहेत. दोघंही आजही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली मात्र नंतर दोघांनी एकत्र फोटो पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता दोघं लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.