छोट्या पडद्यावर करण जोहर आणि रोहित शेट्टी येणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 14:46 IST2017-12-01T09:16:15+5:302017-12-01T14:46:15+5:30

सध्या छोट्या पडद्यावर एका  पाठोपाठ रिअॅलिटी शो रसिकांच्या भेटीला येत आहेत. याच यादीत आता आणखीन एका शोची एंट्री होणार ...

Karan Johar and Rohit Shetty to come together on small screens! | छोट्या पडद्यावर करण जोहर आणि रोहित शेट्टी येणार एकत्र!

छोट्या पडद्यावर करण जोहर आणि रोहित शेट्टी येणार एकत्र!

्या छोट्या पडद्यावर एका  पाठोपाठ रिअॅलिटी शो रसिकांच्या भेटीला येत आहेत. याच यादीत आता आणखीन एका शोची एंट्री होणार आहे.कारण पुन्हा एकदा आपला आगामी शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्ससह खेळाचे नियम बदलण्याचा तयारीत आहे. प्रथमच प्रेक्षकांना अभिनय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशी आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी पाहायला मिळेल, जिथे करण जोहर आणि रोहित शेट्टी हे सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये ह्या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत.ह्या शोबद्दल करण जोहर म्हणाला, “एखाद्या सिनेमातील हिरोप्रमाणे मिळणारे प्रेम आणि त्याच्यासाठी असलेला वेडेपणा खरोखरच अद्‌भुत असतो. त्यामुळे सिनेमांचा हिस्सा बनणे हे अनेकांचे स्वप्न असते.त्यातही सिनेमामुळे तुम्ही जगभरात पोहचतात त्यामुळे हे सगळं अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण अहोरात्र मेहनत करत असतो. त्यामुळे  इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स हा एक असा शो आहे जिथे भावी अभिनेत्यांना त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल.त्यांच्या स्वप्नांना योग्य तो मार्ग दाखवण्याचा काम हा शो करत आला आहे.रोहित शेट्टीसोबत स्टार प्लससारख्या मंचावर उद्याचा सुपरस्टार शोधण्याच्या ह्या प्रवासावर निघताना मी खूप उत्साहात आहेत.”ह्या शोसोबतच्या सहकार्याबद्दल रोहित शेट्टी म्हणाला, “माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त एकच गोष्ट एंटरटेनमेंट. जर एक फिल्म मेकर म्हणून मी ते करू शकलो तर मी माझे काम केले आहे. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. अशा अनेक अभिनेत्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीने टॅलेंटने सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे, तरीही अनेक दशके प्रेक्षकांच्या मनामध्ये ते कसे काय घर करू शकतात याची व्याख्या कोणीच करू शकणार नाही. एक चांगला अभिनेता नेहमीच लक्षात राहतो आणि देशातील रसिकही त्याच्यावर प्रेम करतात. स्टार इंडिया आमच्यासोबत इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचा शोध घेणार आहेत.”करण जोहर आणि रोहित शेट्टी असा मिलाफ ह्याआधी कधीही पाहण्यात आला नव्हता.आता हे दोघे इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्ससाठी एकत्र आले असून ते जगाला सांगतील ''ना खानदान, ना सिफारिश बॉलिवूड को है सिर्फ टॅलेन्ट का इंतजार'.

Also Read:आमिर खानचा 'सत्यमेव जयते सिझन 3' लवकरच रसिकांच्या भेटीला,तर शाहरूखचाही हा शो करणार रसिकांचे मनोरंजन

Web Title: Karan Johar and Rohit Shetty to come together on small screens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.