​करण जोहर सांगतोय ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील सगळ्यात चांगली डान्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:40 IST2018-01-04T12:10:28+5:302018-01-04T17:40:28+5:30

स्टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणास नुकतीच सुरुवात झाली आहे. ...

Karan Johar is the actress who is the best dancer in Bollywood | ​करण जोहर सांगतोय ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील सगळ्यात चांगली डान्सर

​करण जोहर सांगतोय ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील सगळ्यात चांगली डान्सर

टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणास नुकतीच सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी या कार्यक्रमाची टीम प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. या भागात अभिनेत्री प्रियांका चोप्राने विशेष अतिथी परीक्षक म्हणून हजेरी लावली होती. प्रियांका गेल्या कित्येक महिन्यांपासून परदेशात तिच्या हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. सध्या ती त्यातून वेळ काढून भारतात आली आहे. तिच्या या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत तिने  इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमाला हजेरी लावली. करण जोहर आणि रोहित शेट्टी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. प्रियांका अनेक वर्षं बॉलिवूड मध्ये काम करत असल्याने तिचा करण आणि रोहित सोबतचा रॅपो खूपच चांगला आहे. त्यामुळे या तिघांनी कार्यक्रमाच्या दरम्यान खूप मजा मस्ती केली. प्रेक्षकांना ही मजा मस्ती इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहायला मिळणार आहे.
करण जोहर हा खूप चांगला दिग्दर्शक असून त्याने चित्रपटात काम देखील केले आहे. त्याने आजवर अनेक रिअॅलिटी शो मध्ये परीक्षकाची भूमिका साकारली आहे. आपल्या विशिष्ट नृत्यशैलीसाठी करण प्रसिद्ध आहे. त्यामुळे विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्याला आपल्या या नृत्यशैलीचे प्रदर्शन करण्याची विनंती केली जाते. इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात स्पर्धकांच्या अभिनयासोबतच ते कशाप्रकारे स्वतःला सादर करतात हे देखील परीक्षक पाहाणार आहेत. त्याचसोबत त्यांच्या नृत्यावर देखील विशेष टिप्पणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात एक स्पर्धकाने शास्त्रीय नृत्य सादर केले. या शास्त्रीय नृत्याचे परीक्षण करताना करण म्हणाला, देशातील सर्वोत्कृष्ट नर्तक हे कथ्थक नृत्य शिकलेले असतात. माधुरी दीक्षित ही खूप चांगली नर्तिका असून तिने अनेक वर्षं कथ्थक शिकलेले आहे. तिच्या नृत्याचा मी चाहाता आहे. माधुरी ही बॉलिवूडमधील सगळ्यात चांगली नर्तिका आहे. 

Also Read : म्हणून करण जोहरने सोशल मीडियावर मागितली बिग बींची माफी

Web Title: Karan Johar is the actress who is the best dancer in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.