करणने केला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:14 IST2016-06-11T06:49:12+5:302016-06-11T13:14:43+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमातील नैतिक आणि अक्षराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता या मालिकेत नैतिकची भूमिका ...
.jpg)
करणने केला रामराम
य रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमातील नैतिक आणि अक्षराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा ही मालिका सोडणार आहे. करण मालिका सोडणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. पण करणने नेहमीच या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. पण आता करण ही मालिका सोडणार असल्याचे त्याने स्वतः सांगितलेले आहे. करण गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. करणने आता तब्येतीची काळजी न घेतल्यास भविष्यकाळात त्याला तब्येतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल असे डॉक्टरांचे मत आहे. यामुळे करण आता मालिकेला रामराम ठोकणार आहे. करण ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा अनेक वर्षांपासून भाग असल्यामुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेणे त्याच्यासाठी खूप कठीण होते असे तो सांगतो.