जब मिले दो बिछडे यार!! काजोल-करणला एकत्र आणण्यात कपिल यशस्वी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:36 IST2019-04-21T17:33:29+5:302019-04-21T17:36:00+5:30
अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. काजोलने स्वत: त्यांचा सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांना एकत्र आणण्यात अर्थात कपिल शर्माच यशस्वी ठरला असे म्हणायला हरकत नाही.

जब मिले दो बिछडे यार!! काजोल-करणला एकत्र आणण्यात कपिल यशस्वी!
बॉलिवूडची सेनोरिटा काजोल देवगन आणि बॉलिवूडचा ‘द ग्रेट’ दिग्दर्शक करण जोहर यांच्यातली भांडणं तुम्हाला ठाऊक आहेतच. ते दोघे कित्येक वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाहीत. मध्यंतरी काजोलने आमच्यातील सर्व भांडणे संपलीत आम्ही पुन्हा एकत्र आलो असे ट्विट देखील केले होते. मात्र, अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. काजोलने स्वत: त्यांचा सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांना एकत्र आणण्यात अर्थात कपिल शर्माच यशस्वी ठरला असे म्हणायला हरकत नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा सातत्याने करण आणि काजोल यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होता. मध्यंतरी काजोल तिची मुलगी न्यासासोबत सिंगापूरला असल्याने तिला शोवर बोलावणे होत नव्हते. काजोलचे न्यासाच्या शिक्षणाच्या बाबतीत सारखे सिंगापूरला जाणे-येणे सुरूच असते. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये काजोल आणि अजय दोघेही आले होते. मात्र, ती आता करणसोबत कपिलच्या शोमध्ये दिसणार आहे, हे पहिल्यांदाच होणार आहे. कपिलच्या सेटवर काजोल आणि करण यांचे सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत. त्या दोघांनी शोवर खूप धम्माल मस्ती केली. या फोटोंमध्ये काजोल पकि कलरच्या पँटसूट मध्ये दिसत आहे, तर करण जोहर काळया रंगाच्या जॅकेटमध्ये दिसणार आहे.
कपिल शर्माच्या शोवर गेल्या आठवड्यात तीन कलाकार रंजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार हे आले होते. त्या तिघांनी आपले वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी करिअर यांच्याबद्दल खूप मनोरंजक किस्से ऐकवले.