एकेकाळी या मालिकांमुळे घसरला होता 'कपिल शर्मा'चा टीआरपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:09 IST2017-07-25T12:06:05+5:302017-07-25T18:09:31+5:30
'साथ निभाना साथिया','कुमकुम भाग्य','ये है मोहब्बते' आणि 'नागिन' या मालिकेतील रंजक वळणामुळे कपिल शर्माचा हा शो टीआरपी रेसमध्ये नव्हता.टीआरपी ...
.jpg)
एकेकाळी या मालिकांमुळे घसरला होता 'कपिल शर्मा'चा टीआरपी
' ;साथ निभाना साथिया','कुमकुम भाग्य','ये है मोहब्बते' आणि 'नागिन' या मालिकेतील रंजक वळणामुळे कपिल शर्माचा हा शो टीआरपी रेसमध्ये नव्हता.टीआरपी रेसमध्ये त्यावेळी फक्त वुमेन सेंट्रीक मालिकांचाच दबदबा पाहायला मिळाला होता. त्यावेळी कपिल शर्मा शोची टीआरपी घसरली होती आणि चॅनलनेही कपिलला शोमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला होता.छोट्या पडद्यावरील शोमध्ये 'नागिन' या मालिकेनं अव्वल स्थान पटकावलं होतं 'इशिता' आणि 'रमण'ची लव्हस्टोरी असलेल्या 'ये है मोहब्बते'ची जादू रसिकांवर झाल्याचं पाहायला मिळालं.त्यावेळी ही मालिका टीआरपीमध्ये दुस-या क्रमांकावर होती.तर 'कुमकुम भाग्य' तिस-या तर 'जोधा अकबर' ही मालिका चौथ्या क्रमांकावर पोहचली होती,'साथ निभाना साथियाँ' या मालिकेतील गोपीचं दुसरं लग्नाचे ट्विस्टही रसिकांना भावला होता.त्यामुळे ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचली होती.या रेटिंग्समध्ये सगळ्यात आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट म्हणजे कपिलच्या शोला या रेटिंग्समध्ये टॉप फाईव्हमध्येसुध्दा स्थान मिळाले नव्हते. त्यामुळं कपिलच्या शोची जादू कमी होतेय की काय? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.आता कपिल शर्मा टीआरपी रेसमध्ये नसून शो पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.यावेळी कपिल शर्मा शो बंद व्हायला कारणीभूत ठरणार ते म्हणजे सुनील ग्रोव्हरसह कपिल शर्माचा झालेला वाद हे आता सा-यांनाचा माहिती आहे.त्यामुळे कपिल शर्माला सुनील ग्रोव्हरचा वाद चांगलाच भारी पडणार असंच दिसतंय.सध्या 'कपिल शर्मा' आजारी असल्यामुळे तो या शोचे शूटिंग करू शकत नाहीय.त्यामुळे रसिकांनाही रिपीट टेलिकास्ट पाहावे लागत आहे.तेच ते शो पुन्हा पाहण्यात आता रसिकांनाही रस नाहीय.त्यामुळे कपिलचा ऑडीयन्स दुस-या मालिकांकडे वळु लागला आहे.कपिल शर्माचा चाललंलय तरी काय? अशा संभ्रमात रसिक दिसतायेत.