या महिन्यात हलणार कपिल शर्माच्या घरी पाळणा, बाळाच्या जन्माआधी केले हे स्टेटमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 16:41 IST2019-08-21T16:39:35+5:302019-08-21T16:41:20+5:30
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा लवकरच बाबा होणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चरतथ प्रेग्नेंट आहे. सध्या दोघेही कनाडामध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय

या महिन्यात हलणार कपिल शर्माच्या घरी पाळणा, बाळाच्या जन्माआधी केले हे स्टेटमेंट
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा लवकरच बाबा होणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चरतथ प्रेग्नेंट आहे. सध्या दोघेही कनाडामध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय. कपिल शर्मा हॉलीवूड सिनेमा ‘एंग्री बर्ड्स 2’ला आपला आवाज देणार आहे. ऐवढेच नाही तर त्याचे द कपिल शर्मा शोमधले को-स्टार किकू शारदा आणि अर्चना पूरन सिंगदेखील या सिनेमा आवाजा देणार आहेत. 23 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या कपिल शर्मा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
यावेळी कपिलला त्याच्या होणाऱ्या बाळा संदर्भात प्रश्न विचारण्यात आले, यावेळी उत्तर देताना कपिल म्हणाला, मी देवाकडे इतकिच प्रार्थना करतो माझं होणार बाळ सुदृढ असू देत. मुलगा असो किंवा मुलगी त्यांना मी जे काम करतोय त्यावर गर्व असू देते ऐवढीच माझी अपेक्षा आहे.
कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. किस किसको प्यार करूं या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फिरंगी या चित्रपटातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही.
२००७ साली कॉमेडी रिएलिटी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर' चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.