​‘कपिल शर्मा शो’ VS ‘बाजीराव मस्तानी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 20:12 IST2016-04-12T03:09:59+5:302016-04-11T20:12:02+5:30

येत्या २३ तारखेला कपिल शर्मा आपला नवा कोरा शो घेऊन येतो आहे. कपिलने या शोची जोरदार पब्लिसिटी चालवली असताना ...

'Kapil Sharma Show' VS 'Bajirao Mastani' | ​‘कपिल शर्मा शो’ VS ‘बाजीराव मस्तानी’

​‘कपिल शर्मा शो’ VS ‘बाजीराव मस्तानी’

त्या २३ तारखेला कपिल शर्मा आपला नवा कोरा शो घेऊन येतो आहे. कपिलने या शोची जोरदार पब्लिसिटी चालवली असताना कपिलचा हा शो उधळून लावण्याचे मनसूबेही होत आहे. अर्थात व्यवसायात हे सगळं क्षम्य आहे. ‘कॉमेडी नाईट विद कपिल’ या शोने कपिलला अमाप प्रसिद्धी दिली. साहजिकच ‘कॉमेडी नाईट विद कपिल’ हा शो आणणाºया चॅनलचा कपिलच्या यशातील वाटा मोठा आहे. पण कपिलचे याच चॅनलसोबत फाटले आणि त्याने नव्या चॅनलची वाट धरली. अशास्थितीत जुन्या चॅनलने कपिलला ऐनकेनप्रकारे मात देण्याचे प्रयत्न चालवले आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणजे, २३ तारखेला रात्री ९ वाजता नव्या चॅनलवर कपिलचा नवा शो येईल. त्याच दिवशी नेमक्या त्याच वेळेला कपिलच्या प्रतिस्पर्धी चॅनलवर ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.  म्हणजेच ‘कपिल शर्मा शो’  VS  ‘बाजीराव मस्तानी’ काय आले ध्यानात???
 

Web Title: 'Kapil Sharma Show' VS 'Bajirao Mastani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.